कोपरगावात नदीत उडी मारुन एकाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गोदावरी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केलेल्याच्या पत्नीवर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 29 जुलैला दुपारी 1 च्या सुमारास देविदास सुखदेव बावीस्कर (वय 36) यांनी शहरातील गोदावरी नदीच्या छोटया पुलावरून उडी मारली होती. गोदावरी नदीला पूर परिस्थिती होती. 



बावीस्कर नदीत वाहून केले. मयताची पत्नी सुरेखा देविदास बावीस्कर (रा. कोपरगाव, मूळ राहणार पाचोरा, जि. जळगाव) ही देविदास यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याची फिर्याद मयताची बहिण वनिता बावीस्कर यांनी दिली. 

यावरुन मयताची पत्नी सुरेखा बावीस्कर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जं. वंजारी करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.