कोपरगाव तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आम्ही सत्तेवर असो अगर नसो माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याचा वसा घेऊन सातत्याने विकासाची दृष्टी ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन प्रचार सभेचे अध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे विश्वस्त व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी जिल्हा परिषदेच्या चांदेकसारे गटातील भाजप मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी विक्रम पाचोरे यांच्या प्रचाराच्या शुभारंभी केले. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

बिपीन कोल्हे म्हणाले, जिरायत भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळावी यासाठी संस्थानकडून पाचशे कोटी रूपयांचा निधी मिळवून देण्यासाठी आग्रह धरला. सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी दिली आहे. आ. स्नेहलता कोल्हे ह्या तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

त्यांच्या प्रयत्नामुळेच दारणा, गंगापूर धरणांवरील वाढलेले बिगरसिंचन पाण्याचे आरक्षण सर्व धरणांवर समप्रमाणात पुन्हा टाकण्यात आले. परिणामी शेतीसाठी पाटपाण्याचे एक आर्वतन वाढले. तेव्हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या भाजप उमेदवाराला चांदेकसारे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आ. कोल्हे म्हणाल्या, अडीच वर्षात चांदेकसारे जिल्हा परिषद गटात विविध योजनेतून तसेच आपल्या स्थानिक विकास निधीतून २० कोटी ६२ लाख रूपयांची विकास कामे केली आहेत. अजुनही प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयात पाठपुरावा सुरूच आहे. काकडीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत बैठक घेतली.

त्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय काकडीतून विमान उड्डाण होवू देणार नाही. मतदारांनी विकासाला मत द्यावे, भुलथापांना बळी पडू नये. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत विरोधक सातत्याने गोबेल्स तंत्राचा अवलंब होत आहे. पण सुरूवातीपासूनच आपण शेतकऱ्यांबरोबरच आहोत, त्या संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

याप्रसंगी काळे गटातून वेस येथील नवनाथ आरणे, साहेबराव आरणे, साईनाथ आरणे यांनी भाजपत प्रवेश केला. सूत्रसंचालन संदिप जाधव यांनी केले. आभार रमेश औताडे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.