कोपरगाव तालुक्याचा विकास करण्याची जबाबदारी आमची.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समृद्धी महामार्ग असो की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपाला बिनशर्त पाठिंबा दिला. चांदेकसारे, डाऊच खु., कोकमठाण, कान्हेगाव, भोजडे, धोत्रे, संवत्सर, घारी, जेऊर कुंभारी आदी गावातील शेतकऱ्यांसाठी न्यायालयात धाव घेऊन स्मार्ट सिटी दुसरीकडे घालवली. 


जमिनी वाचविल्या जे केले ते कुठलाही आडपडदा न ठेवता केले. काकडीसारख्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी विमानतळ आणले. परंतु, विमान प्राधीकरण व शासनाकडून आजपर्यंत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्याही बाबतीत न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. 

समृद्धी महामार्ग असो की, काकडी विमानतळ जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, अशी ठाम ग्वाही कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी दिली.

चांदेकसारे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार सोनाली राहुल रोहमारे यांच्या प्रचार नारळ सभेत बोलताना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अनुसया होन होत्या.

प्रास्तविकात अशोक रोहमारे यांनी विरोधकांच्याकडे विकासाची कोणतीही दूरदृष्टी नाही असे सांगितले. जि.प. सदस्य राजेश परजणे म्हणाले, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असून मागील सहा महिन्यात प्रलंबित असलेली विकास कामे सर्वत्र सुरु आहेत. 

कोपरगाव तालुक्याचा विकास करण्याची आमची सामुदायिक जबाबदारी आहे. राजेंद्र जाधव यांनी उजनी, निळवंडे सारख्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आल्याचे सांगितले. 

यावेळी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रास्तविक अशोकराव रोहमारे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. योगेश खालकर यांनी केले. आभार राउसाहेब कोल्हे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.