शेतक-यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही - आशुतोष काळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील देर्डे – को-हाळे, पोहेगाव खु. चांदेकसारे, डाऊच खु., कोकमठाण, कान्हेगाव, भोजडे, धोत्रे, संवत्सर, घारी, जेऊर कुंभारी आदी गावातील शेतक-यांवर व नागरिकांवर समृद्धी महामार्गाचे संकट आले त्यावेळी या गावातील शेतक-यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलो. शेतक-यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाच्या संकटातून सोडविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे शासनाने स्मार्ट सिटी दुसरीकडे नेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील शेतक-यांच्या जमिनी वाचल्या. मी यापुढेही शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे 


परंतू समृद्धी महामार्गाच्या बाबतीत शेतक-यांसोबत असल्याचे खोटे बोलायचे व सरकारच्या बैठकीत सरकारच्या बाजूने बोलायचे, अशी दुटप्पी भूमिका समृद्धी महामार्गाच्या बाबतीत घेतली तीच भूमिका शेतकरी संपामध्ये घेतली. अशा दुटप्पी भूमिका घेणा-यांना त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

चांदेकसारे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अनुसया होन होत्या. चांदेकसारे गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली राहुल रोहमारे यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ पोहेगाव येथील मयुरेश्वर मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. 

या प्रसंगी आशुतोष काळे पुढे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी काकडी सारख्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी विमानतळ आणले. परंतु विमान प्राधिकरण व शानाकडून आजपर्यंत प्रकल्पबाधित शेतक-यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. त्याही बाबतीत न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. जोपर्यंत काकडीच्या शेतक-यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना अशोकराव रोहमारे म्हणाले की, आपली ठेकेदारी अबाधित राहावी यासाठी विरोधकांना सत्ता पाहिजे, त्यासाठी सरपंच पदापासून तर जिल्हा परिषद पदाची त्यांना सत्ता हवी आहे. त्यांच्या राजकारणाचा जवळून अनुभव घेतला असून सत्तेसाठी कार्यकर्त्यांना वा-यावर सोडून त्यांनी सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवल्यामुळे आज त्यांच्यापासून कार्यकर्ते दूरावले आहे. त्यामुळे त्त्यांच्याकडे विकासाची कोणतीही दूरदृष्टी नसल्याचे सांगत विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना निवडून द्या असे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे म्हणाले की,पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडे असून मागील सहा महिन्यात प्रलंबितअसलेलि विकास कामे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. कोपरगांव तालुक्याचा विकास करण्याची आमची सामुदायिक जबाबदारी असल्याचे सांगत शेतक-यांच्या आयुष्यावर नांगर फिरविणा-या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करने चुकीचे असल्याचे सांगितले. 

राजेंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, उजनी, निळवंडे सारख्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे कोपरगाव तालुक्याच्या जनतेला भावले आहे. तालुक्याच्या जनतेला विकास हवा आहे कारण सध्या तालुक्यात विकास ठप्प असून पोस्टरबाजी मात्र जोरात चालू असल्याचे सांगितले. यावेळी कैलास गव्हाणे, सचिन रोहमारे, सोपानराव गवळी, नारायण होन, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

चांदेकसारे गटाच्या अंतर्गत येणा-या सर्व गावांचा विकास करणे हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून निडणूक लढवीत असून संपूर्ण चांदेकसारे गटाच्या अडचणी व प्रश्न काय आहेत यांचा अभ्यास करूनच निवडणूक लढवीत आहे. – सौ. सोनाली राहुल रोहमारे (उमेदवार राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेस)

२१ ऑगस्ट रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून याच दिवशी योगयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांचा वाढदिवस असून सौ. सोनाली राहुल रोहमारे यांना निवडून देवून वाढदिवसाची भेट देणार – सभापती सौ. अनुसया होन.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.