राजकारण न करता शहर विकास हाच माझा अजेंडा - वहाडणे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  उद्याने, रस्ते, चौक, ओपन स्पेस विकसित करताना शहरातील वाहतूक कोंडी करणारी अतिक्रमणे तसेच घंटागाडीला अडचण करणारी छोटी-मोठी अतिक्रमणे, मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करणार आहे. याकामी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करत कोणतेही राजकारण न करता शहरविकास करणे हाच माझा एकमेव अजेंडा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. 


दोन दशकानंतर जिजामाता उद्यान सफाई कामगार पत्नी अलका भाऊसाहेब राखपसरे यांच्या हस्ते रक्षाबंधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका श्रीमती भारती वायखिंडे होत्या.

यावेळी संदीप वर्पे यांनी काही कामांबाबत लाखो रूपयांच्या घोटाळ्याबद्दल संशय व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी लहान बालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, समाधान सर्वात महत्वाचे आहे, असे सांगितले. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनीही जिजामाता उद्यानाच्या नव्याने झालेल्या नुतनीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी योगेश बागुल, उमा वहाडणे, विवेक सोनवणे, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, अतुल काले, प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, मोदी विचारमंचचे शहराध्यक्ष, विनायक गायकवाड, सरचिटणीस, चेतन खुबाणी, चिटणीस, संजय कांबळे, किरण थोरात, प्रसिद्धी प्रमुख प्रा. सुभाष शिंदे, सोमनाथ अहिरे, विश्वास गोर्डे, रविंद्र बागरेचा, विनीत वाडेकर, संजय वायखिंडे, मुकूंद कालकुंद्री, गौल, विजय भोईर, नागरिक, महिला, मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. न.पा. कर्मचारी सोपान शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अधिकारी कर्मचारी, नरेंद्र मोदी विचारमंचचे कार्यकर्ते हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.