पाळीव व भटक्या कुत्र्याचा अचानक मृत्यू कर्जत शहरात घबराटीचे वातावरण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कर्जत शहरातील उपनगरात अनेक कुत्र्यांना विषबाधा होऊन २० च्या आसपास कुत्रे मरण पावल्याचे पहावयास मिळत आहे. काही भटक्या कुत्र्यापासून सुटका मिळविण्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्राचा योग्य उपयोग झाला असला तरी यामध्ये काही पाळीव कुत्रेही मेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जत शहरातील विठाई नगर बुवासाहेब नगर परिसरात गेली दोन तीन दिवसात अनेक कुत्री मेल्याचे पहावयास मिळत आहे.


यामध्ये काही पाळीव कुत्रे असून काही मात्र भटके कुत्रे आहेत. कर्जत शहरात विविध उपनगरात गेली काही दिवसापासून भटक्या कुत्र्याचा मोठा त्रास नागरिकांना होत होता. हे कुत्रे शेळ्या त्याची करडे छोटी वासरे याना आपले भक्ष बनवत होते तर कधी कधी माणसावर हि गुरकत होते. त्यामुळे परिसरात या कुत्र्याची मोठी दहशत निर्माण झाली होती दरम्यान अचानक या परिसरात कुत्रे मरून पडल्याचे पहावयास मिळू लागले.

दरम्यान काही नागरिकांनी पाळलेले कुत्रे हि मरू लागले यामुळे कुत्रे पाळणार्या लोकांना खूप वाईट वाटले अनेक जन आपल्या पाळीव प्राण्यावर मुलासारखे प्रेम करतात त्याना वेळचे वेळी खायला घालतात व अशा घरातील सदस्याचे अकस्मात जाणे त्या कुटुंबियांना मोठे धक्का देणारे असते अशाच एका पाळीव कुत्र्याला जीवापाड जपणार्या अशोक बचाटेसरांनी त्याच्या अकस्मात जाण्याने त्याचे मृतदेहाशेजारी उदबत्ती लावली त्यास हार घालून जड अंतकरनाणे जेसीबीने खड्डा खणून त्यास पुरण्यात आले. 

याबाबत सोशल मिडीयामध्ये त्याचे फोटो टाकून बचाटेसर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात कि आमच्या घरातील एक सदस्य, ज्याला लहाणपणी बाटलीने दुध पाजुन मोठा केला, कुटुंबातीलच म्हणुन खुप जपलं..त्याने त्या ऊपकाराची फेड इतक्या ईमानाने केली की शब्दात वर्णन करणे कठीण..त्याचं कराव तेवढं गुणगान कमीच...एखादा दिवस गावाला गेलं तर आल्यावर अंगावर ऊड्या मारुन मारुन वैतागुन सोडणारा टाॅमी. .पण कुणातरी राक्षसी प्रवृत्तीला हे पाहावलं नाही..त्याच्यावर विषप्रयोग करुन निष्पाप मुक्या जिवाचा बळी घेतला..टाॅमी काल मरण पावला..त्याची अवस्था पाहुन मानवी स्वभावाचीअशी चिड आली की...त्याच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हिच सद्भावना...

अशी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली वाहतानाच या शिक्षक महोदयानी अतिविनम्रतापुर्वक विनंती करत कधीही मुक्या प्राण्यांच्या जिवाचा खेळ होऊ देऊ नका..ते निष्पाप असतात...त्यांना रक्ताचं नातेवाईक नसलं तरी...त्यापेक्षाही जास्त जपणारं कुणितरी असतं...जर आपल्या आजुबाजुला अशा प्रवृत्ती असतील तर त्यांना असं करण्यापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा अशीही नम्र विनंती सोशल मिडीयाच्या पोस्ट मधून करण्यात आली आहे. 

याबाबत माहिती घेतली असता कुणाच्या तरी दोन करडाना भटक्या कुत्र्यांनी ओढून नेले त्या लोकांना अशा कुत्र्याचा खूप राग आला मग त्यांनी त्याच मेलेल्या करडाच्या मासावर काही विषारी औषध टाकले व ते मांस ज्या ज्या कुत्र्यांनी खाल्ले ती कुत्री मेली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात असून बुवासाहेब नगर विठाई नगर व परिसरात या मेलेल्या कुत्र्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली असून नगर पंचायतीने वेळीच भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त केला असता तर पुढील अनर्थ टळला असता अशी चर्चा नागरिक करत आहेत. 

तर विठाई नगर परिसरात या पाळीव कुत्र्यामुळे रात्रीच्या वेळी कोनाला येताच येत नव्हते त्यामुळे सध्या गुन्हेगारी क्षेत्रात गाजत असलेल्या कर्जत मध्ये आपल्या कृष्ण कृत्यांना अडसर ठरत असलेल्या या कुत्र्याचा काटा काढून आपले गुन्हेगारी कृत्य करण्याचा मार्ग कुणी मोकळा केला काय असा प्रश्न विचारला जात असताना या तून एखादा मोठा गुन्हा परिसरात होऊ नये अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत या दृष्टीने पोलिसांनी या शुल्लक वाटणाऱ्या बाबीकडे गांभीर्याने पहावे असे आवाहन नागरीकातून केले जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.