जागेच्या वादातून मारामारी व धमकीच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमच्या जागेवर बळजबरीने अतिक्रमण करून राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेल्या व्यक्तीकडून आम्हाला मारहाण करून पुन्हा आमच्यावर चार दिवसांनी गुन्हा दाखल केला जात असून याबाबत पोलीसाची भूमिका संशयास्पद असून आपले काही बरे वाईट झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन राशीन येथील रोहिदास काळे यांनी काढले आहे. 


राशीन येथे जागेच्या वादातून मारामारी धमकी अशा परस्पर विरोधी तक्रारी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या आहेत. यानंतर या मारहाणीस आठ दिवस होत आलेले असताना राशीन येथील रोहिदास हरिश्चंद्र काळे यांनी निवेदन काढून पोलीसावर गंभीर आरोप केले आहेत.

यामध्ये म्हटले आहे कि दि २ ऑगष्ट रोजी आमच्या कुटुंबीयावर प्राणघातक हल्ला झाला. ज्यांनी हल्ला केला ते राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत त्यांनी पदाचा वापर करून पोलीस प्रशासन, समाज, वकील संघटना याची दिशाभूल करून आमची बदनामी करत आमचेवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. 

दमदाटीच्या जोरावर जागा बळकावणे हा त्याचा व्यवसायच आहे. उतार्यावर नाव नसताना आमच्या खरेदीच्या जागेवर बळजबरीने अतिक्रमण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्यास आम्ही विरोध केला असता आमच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. याचे सुदैवाने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यानंतर तीन दिवसांनी आम्ही गोळीबार केल्याची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली पोलीस हि कोणतेही पुरावे नसताना कानाडोळा करून त्याचे कारवाई करण्याऐवजी आम्हालाच गुन्हेगार ठरवीत आहेत. 

गावातील व्यापारी व वकील संघटनानी हि कोणतीही शहानिशा न करता यांच्या राजकीय दबावाला बळी पडून घटनेला वेगळे वळण लाऊन आमच्यावर अन्याय केला आहे. आमच्या तक्रारी नुसार कारवाई करणे आवश्यक असताना तेच लोक चार दिवसांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमच्या विरुद्ध फिर्याद दाखल करतात त्यावेळी हि त्याचे वर कार्यवाही केली जात नाही. 

सदरच्या लोकांनी राशीन गावातील अनेक जागां दहशतीने व हाणमार करून अशाच लुटल्या आहेत. त्याना पहिल्यादाच आम्ही विरोध केल्यामुळे आमच्यावर हल्ला करण्यात आला असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना दिले असून हि त्याचे वर कार्यवाही होत नाही त्यामुळे मला व कुटुंबियाच्या जीविताला याचे पासून धोका असून आमचे काही बरे वाईट झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असे या निवेदनात म्हटले आहे. 

राशीन येथे काळे राजेभोसले याच्या वादामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून प्रथम ३ ऑगष्ट रोजी कमल रोहिदास काळे यांनी संभाजी राजेभोसले याचे सह इतर ३० लोकांविरुद्ध आमचे सुरु असलेले बांधकाम पाडले जात असताना आम्ही बांधकाम पाडू नका म्हणून विरोध केल्याचा राग धरून मारहाण केली ट्रकटर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, विनयभंग केला गळ्यातील दागिने ओढून नेले तलवारीने वार केले अशा आशयाची तक्रार नगर येथे दाखल केली होती. 

तर दि ४ ऑगष्ट रोजी शहाजी राजेभोसले यांनी हरिश्चंद्र काळे व इतर २० लोकाविरुद्ध तुम्ही बांधकाम का करता तुम्हाला असे विचारल्याने त्याचा राग येऊन रिव्हाल्व्हरचा धाक दाखवून फायर केला व गज काठ्या तलवारीने मारहाण केल्याची तक्रार नगर येथेच दाखल केली. दोन्ही तक्रारी कर्जत पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.