नान्नज गावात दिवसभर कडकडीत बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नान्नज येथील गोपाळपुरा येथे तीन मूर्तींची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. ही घटना नान्नज व या परिसरातील ग्रामस्थांना समजताच या घटनेचा तीव्र निषेध करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्याबरोबरच या घटनेचा निषेध म्हणून नान्नज गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

नान्नज गावातील गोपाळपुरा येथे असलेल्या दत्त मंदिर, महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर व पांडुरंगाचे मंदिर अशी एकूण पाच मंदिरे आहेत. तसेच नान्नजसह या परिसरातील नागरिकांची या देवतांवर श्रध्दा आहे. आज रविवार दि.६रोजी मंदिराचे पुजारी सोमनाथ क्षीरसागर नेहमी प्रमाणे पूजा करण्यासाठी गोपाळपुरा येथील मंदिरात आला असता. त्याला मंदिरातील मूर्तींची कोणीतरी विटंबना केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे पुजारी भयभीत झाला होता. त्यामुळे ही घटना त्याने उशिरा गावातील विश्वस्तांना सांगितली. तशी ही घटना नान्नज गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मोठा जमाव गोपाळपुरा मंदिराच्या परिसरात जमा झाला.

ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील पाटील पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे,नामदेव सहारे व प्रभारी तहसीलदार विजय भंडारी, विठ्ठलराव चव्हाण, गहिनीनाथ यादव घटनास्थळी दाखल झाले. अहमदनगर येथून श्वान पथक घटनास्थळी आले होते. प्रशासनाने ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. या वेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला अटक करेपर्यंत गाव बंद करू असे सांगितले. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले. तरीही रविवारी घटनेच्या निषेधार्थ नान्नज गावातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.

पोलिसांनी सकाळी पुन्हा ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन संबंधित मूर्ती बदलून त्या ठिकाणी फोटोच्या प्रतीमा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी गावात शांतता पाळण्याचे आवाहन केले. मंदिरात फोटोच्या प्रतीमा ठेवण्यात आल्या आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.या घटनेमुळे तालुक्यातील अनेक संघटनांकडुन निषेध करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी रात्र भर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नान्नज येथे शांतता निर्माण झाली आहे.

अहमदनगर येथून पोलीस फौज फाटा तातडीने दाखल झाला. नागरिकांनी शांतता पाळण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. पुजाऱ्याच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व हे कॉ विठ्ठल चव्हाण. गहिनीनाथ यादव हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.