''त्या'' तलाठ्यांच्या विरोधात बोलण्यास विरोधकांची तेरी भी चूप मेरी भी चूप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पिक विमा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या सातबारा उतार्‍यासाठी शासनाने ठरवुन दिलेली रक्कम न घेता मनमानी रक्कम उकळून शेतकर्‍यांना लुटणाऱ्या तालुक्यातील दहा तलाठ्यांचे गंभीर प्रकरण नुकतेच उजेडात आले. या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असली तरी अजून त्या दोषी तलाठ्यांविरोधात ठोस कारवाई झालेली नाही. 


त्यातच शेतकर्‍यांचा कळवळा दाखवणारे तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना मनसे व इतर राजकीय पक्ष या प्रकरणी मुग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसत असल्याने तालुक्यातील बळीराजाच्या आवाज कोण बनणार ? बळीराजाला न्याय कोण देणार ? असा खडा सवाल जनतेतून विचारला जात असल्याने राजकीय पक्षांना आपली भूमिका वेळीच जाहीर करावी लागणार असुन जर राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेतली नाही तर या पक्षांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून जामखेड तालुक्यातील शेतकरी पीक विमा भरण्यासाठी जुने तहसील कार्यलयात तलाठी कार्यालयात गर्दी करत आहेत शासनाने मुदत वाढवून दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असताना जामखेड तालुक्यातील काही तलाठी शेतकऱ्यांची अडवणूक करून अव्वा चे सव्वा पैशे मागत आहे.

याकडे तहसीलदार व्ही इ भंडारी यांनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे आता नव्याने आलेल्या कर्तव्यदक्ष प्रांतधिकारी अर्चना नष्टे ,जिल्हाधिकारी अभय महाजन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत त्यातच राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदार संघातच असा प्रकार घडल्याने कोणती कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.  

तसेच तलाठ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे नागरिक अर्थाने त्रस्त आहेत; परंतु बोलणार कुणाला, असा प्रश्‍न आहे. ‘तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार’ अशी स्थिती खरोखरच जामखेड तालुक्याची झाली आहे. तलाठी आव्वा चे सव्वा पैशेबद्दल बोलायचे नाही, गावात तलाठी येत नाही शेतीच्य प्रत्येक कागदपत्रांसाठी तलाठी पैशाची मागणी करत असूनही ‘ब्र’ काढायचा नाही,,तर तो सहन करायचा, या पिळवणूकविरुद्ध बोलणार कोण ?

सध्या तालुक्यातील राष्ट्रवादी ,काँग्रेस ,शिवसेना ,मनसे ,शेतकरी संघटना शेतकऱ्यांना लुटणार्या तलाठ्यांच्या विरोधात विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे त्यामुळे एकमेका करू सहाय अवघे धरू सुपन्थ असे प्रकार तर होत नाही ना ? अशी चर्चा तालुक्यात होत आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.