तलाठ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील शेतकर्‍याकडुन शेतीच्या उतार्‍यासाठी पैसे घेणार्‍या "त्या" दहा तलाठ्यांविरोधात आलेल्या तक्रारींची जिल्हाधिकारी कार्यालया कडून गंभीर दखल घेण्यात आली असुन त्या तलाठ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.यामुळे त्या तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत.


गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतीचा उत्तरा काढण्यासाठी तलाठी कार्यलयात गर्दी करत आहे शेतीचा उतारा काढण्यासाठी शासनाने 15 रूपये घेण्याचा आदेश असताना तलाठ्याकडुन उतार्यासाठी तब्बल ३० ते ४० रू तर पिक विमाचा अर्जावर सही करण्यासाठी 10 ते २० रू चा दर आकारूण शेतकर्‍यांची लुट होत असतनाया याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

तालुक्यात अधिच पाऊस नसल्याने शेतकरी दुबार पेरणी करावी लागणार आहे संकटात असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक शासकीय अधिकारीच करत असल्याचे समोर आले होते यामध्ये तब्ब्ल १० तलाठी पैशे घेतानाचे व्हिडीओ व्हयरल झाले प्रत्येक गावातील तलाठी सज्जे येथे तलाठ्याना काम करण्याचे आदेश असताना देखील रेंज प्रोब्लेम चा नावाखाली सर्व तलाठी जामखेड येथे काम करतात.

या सज्जांचे तलाठी, कार्यालयात बसतच नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी त्यांची शोधाशोध करावी लागते.सज्जातील प्रत्येक तलाठ्याने आपल्या सोयीनुसार वार ठरवून दिले आहेत. मात्र, या दिवशीही हे तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे एखाद्या गावातील शेतकऱ्यांना तलाठी शोधत जामखेड मध्ये यावे लागते यासाठी शेतक-यांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.

काल पंतप्रधान पिक विम्यासाठी शेतकरी जामखेड येथे येऊन उत्तरे काढण्यासाठी आले होते यावेळी संबंधित तलाठ्याकडुन एक उतारा काढण्यासाठी 30 ते 40 रूपये आकारण्यात येत होते तर पिक विमाचा अर्जावर सही करण्यासाठी 20 ते 30 रूपये घेऊन शेतकर्‍यांना अडवणूक करण्याचे प्रकार सध्या चालू असून प्रभारी तहसीलदार याकडे कानाडोळा करत आहे.

त्या" दहा तलाठ्यांविरोधात आलेल्या तक्रारींची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असुन त्या तलाठ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.यामुळे त्या तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पिकविमा भरण्यासाठी आवश्यक असलेला सातबारा उतारा घेण्यासाठी अवाजवी रकमा उकळून शेतकर्‍यांची लुट करणार्‍या तलाठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी ठोस कारवाई करून सुशासनाची अंमलबजावणी करणार काय ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.