जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांची तलाठ्याकडुन सर्रास लुट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जामखेड तालुक्यातील तलाठी कार्यालयात घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची तलाठ्याकडुन सर्रास लुट करत आहेत शेतीचा उतारा काढण्यासाठी शासनाने 15 रूपये घेण्याचा आदेश असताना तलाठ्याकडुन उतार्यासाठी तब्बल ३० ते ४० रू तर पिक विमाचा अर्जावर सही करण्यासाठी 10 ते २० रू चा दर आकारूण शेतकर्‍यांची लुट होत असताया याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे .


अगोदरच पाऊस नसल्याने संकटात असलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक शासकीय अधिकारीच करत असल्याचे समोर आले आहे.पालकमंत्री राम शिंदे याचाच मतदार संघात अशी लुट होताना दिसत आहे राज्याचे जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे कोणती कारवाई करतात​​ याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

काल दि 31 रोजी जुन्या जामखेड तहसील कार्यालयात असलेल्या तलाठी कार्यालयात शेतकरी पिक विमासाठी उत्तराकाढण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येक गावातील तलाठी सज्जे येथे तलाठ्याना काम करण्याचे आदेश असताना देखील रेंज प्रोब्लेम चा नावाखाली सर्व तलाठी जामखेड येथे काम करतात , या सज्जांचे तलाठी, कार्यालयात बसतच नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी त्यांची शोधाशोध करावी लागते.सज्जातील प्रत्येक तलाठ्याने आपल्या सोयीनुसार वार ठरवून दिले आहेत. 

मात्र, या दिवशीही हे तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे एखाद्या गावातील शेतकऱ्यांना तलाठी शोधत जामखेड मध्ये यावे लागते यासाठी शेतक-यांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.

 काल पंतप्रधान पिक विम्यासाठी शेतकरी जामखेड येथे येऊन उत्तरे काढण्यासाठी आले होते यावेळी संबंधित तलाठ्याकडुन एक उतारा काढण्यासाठी 30 ते 40 रूपये आकारण्यात येत होते तर पिक विमाचा अर्जावर सही करण्यासाठी 20 ते 30 रूपये घेऊन शेतकर्‍यांना अडवणूक करण्याचे प्रकार सध्या चालू असून प्रभारी तहसीलदार याकडे कानाडोळा करत आहे.

आधीच तालुक्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना तलाठ्यांकडून अशी पिळवणूक होत आहे याबाबत काही तलाठी अव्वाचे सव्वा पैशे घेतानाचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाले आहे तर काही तलाठी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयात आलेच नसल्याचे दिसून आले. 

संबंधित तलाठ्यांना नागरिकांनी फोन करून विचारले असता उत्तरे काढण्यासाठी आम्हाला वेळ लागत आहे तुम्ही बसा असे बोलून फोन कट केला त्यानंतर संबंधित तलाठी हे दुपारी २. ३० वाजता तलाठी कार्यालयात हजर झाले त्यानंतर शेतकऱ्यांचे काम चालू केली त्यातच काही तलाठ्यांनी ऑनलाईन च्या उत्ताऱयावर सही करण्यास नकार दिला तर काही तलाठ्यांनी चक्क १० ते २० रुपये घेऊन ऑनलाईन च्या उत्ताऱयावर सही केली.

त्यामुळे शासनाचा निर्णय अरी कोणता संभ्रम निर्माण झाला आहे तसेच  संबंधित तलाठ्यांवर त्वरीत कारवाईची  मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, पालकमंत्री राम शिंदे याचाच मतदार संघात अशी लुट होताना दिसत आहे राज्याचे जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे तलाठ्यांवर कोणती कारवाई करतात​​ याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.