कर्जत तालुक्यामध्ये सापडले दोन मृतदेह.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यात वेगवेगळया ठिकाणी दोन मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनासह अकस्मात घटना, आत्महत्या यामुळे सर्वत्र भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 


कर्जत तालुक्यात काल सोमवारी (दि.७) रक्षाबंधनाच्या दिवशी दोन व्यक्तीचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. खातगाव जवळील नदीच्या पाण्यात एका पोत्यात खाली डोके वर पाय असलेला मृतदेह एका शेतकऱ्यास आढळून आला. 

त्या व्यक्तीने गावात ही माहिती दिली. सदर मृतदेहाचे पाय वरती होते, तसेच मृताच्या पायात जोडवे असल्याने हे प्रेत महिलेचे असल्याची खबर पोलिस पाटील बिभीषण अनारसे यांनी कर्जत पोलिसांना दिली. ही खबर कळताच तात्काळ कर्जतचे पोलिस पथक घटनास्थळी पोहचले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या प्रेतास बाहेर काढले. 

सदरची महिला आंबीजळगाव येथील अलका दशरथ राउत (वय ५०) ही असल्याचे काही लोकांनी ओळखले. मात्र तिचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याची अद्यापि माहिती मिळू शकली नाही. शनिवार दि.५ रोजी दुपारी २ वाजता पारायण करून सदरची महिला घरी जेवण्यासाठी गेली असता, दुपारी २ ते ३ पासून ती गायब असल्याचे तिचे वडिलांनी सांगितले. 

याबाबत त्यांनी नातेवाईकांकडे फोनद्वारे चौकशी केली. मात्र तिचा तपास लागला नव्हता. सोमवारी सकाळी ९ वाजता मका भिजविण्यास गेलेल्या एका शेतकऱ्यास सदर महिलेचे प्रेत पाण्यात आढळून आले. 

याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे करत आहेत. घटनास्थळास पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी भेट दिली. सदर महिलेचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.