काष्टी येथील जोशी समाजातील १२ जातपंचांविरूध्द गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुलीला नांदवत नसल्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिस ठाण्यात व कोर्टात तक्रार दिल्याचा राग मनात धरून. मुलगी व तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना वाळीत टाकल्याच्या कारणातून काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात काष्टी येथील जोशी समाजातील १२ जात पंचांविरोधात सदर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रामदास विठ्ठल मोरे (रा. पाबळफाटा, ता.शिरूर) यांच्या एका कन्येचा श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील राहुल भोसले यांच्याशी सुमारे सहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. परंतु सासरी होणाऱ्या त्रासामुळे ती मुलगी सासरी नांदत नसून, वडील मोरे यांच्याकडे माहेरी राहते.

त्यामुळे मोरे यांनी काष्टी येथे जाऊन मुलीचे पती जावई राहुल भोसले व दीर, सासू यांना मुलीला नांदवण्याची विनंती केली. परंतु ते मुलीला नांदवण्यास तयार नव्हते. त्यामुळे मुलीने व मोरे यांनी जावई राहुल भोसले यांच्याविरोधात व मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार देऊन, नगर येथे न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. तो वाद अजून कोर्टात चालू आहे.

परंतु पोलिसात तक्रार केल्याच्या कारणातून काष्टी येथील जोशी समाजाचे पाटील बापू दगडू भोसले यांनी पंच मंडळी बोलावून रामदास मोरे यांना समाजातून वाळीत टाकल्याबाबत पत्र पाठवले. ते मोरे यांनी स्वीकारले नाही तरी त्यांना वाळीत टाकले आहे. 

त्यामुळे मोरे यांना.कोणतेही नातेवाईक कार्यक्रमाला बोलावत नाहीत, सुखदु:खाच्या घटनेत सामील होऊ देत नाहीत तसेच मोरे यांनी त्यांचे सहा महिन्यापूर्वी वडील वारले होते तेव्हा देखील वाळीत टाकल्याच्या कारणातून त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीस कोणीच हातभार लावला नाही.

त्यामुळे त्यांना एकट्याला वडिलांचा अंत्यविधी करावा लागला तसेच आपल्या बिगर लग्नाच्या मुलाचे व मुलीचे लग्न होत नसल्यामुळे आपले मनोधैर्य खचले असून वाळीत टाकल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला जगणे मुश्किल झाल्याची तक्रार रामदास मोरे यांनी दिली आहे.

त्यांच्या फिर्यादिवरून काष्टी येथील बापू दगडू भोसले, नाना श्रीपती वायकर, शाहू देविदास सोनवणे, अभीमान सोमनाथ चित्रे, तात्या सूर्यभान सोनवणे, ज्ञानदेव शिवाजी भोसले, मच्छिंद्र ज्ञानदेव ईगवे, महादेव नामदेव वायकर, ज्ञानदेव शिवाजी भोसले, बिभीषण शिवाजी दोरकर, सनी लक्ष्मण सूर्यवंशी, वसंत किसन वायकर (सर्व रा. काष्टी) या जातपंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.