पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगार येथे पतीने पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा. भिंगार) यास तात्काळ अटक करण्याची कारवाई कॅम्प पोलिसांनी केली आहे. दरम्यान, या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार दि. ३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डेअरी फार्म ते भिंगार जाणाऱ्या रस्त्यावर पोर्णिमा श्रीकांत मोरे (रा. डेअरी फार्म, भिंगार) या शाळेत गेलेल्या आपल्या लहान मुलांना आणण्यासाठी ओळखीच्या शिक्षकाच्या गाडीवर जात असताना त्यांच्या पतीने जुन्या कौटुंबिक रागातून त्यांना रस्त्यावर अडवून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर ॲसिडसारखा घातक पदार्थ टाकून गंभीर जखमी केले व तेथून पळ काढला. पोर्णिमा यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यांच्या जबाबावरून कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कैलास देशमाने, पोसई संजय कवडे, सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोना राजू सुद्रिक, पोकॉ ज्ञानेश्वर शिंदे, पोना पवार, पोकॉ राहूल द्वारके, पोकॉ अडसूळ यांच्या पथकाने शुक्रवार दि. ४ रोजी भिंगार परिसरातील डेअरी फार्म काटवनात पाठलाग करून पकडले. तसेच या गुन्हयात वापरलेली ॲसिडची बाटलीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जुन्या कौटुंबिक भांडणातून हा गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणाचा अधिक तपास पोनि कैलास देशमाने हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.