गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विना परवाना बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन जाणारा मालवाहू टेम्पो भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडला असून ही कारवाई स्टेशन रोडवरील चांदणी चौक येथे मंगळवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास केली. 
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संगमनेरहून एक टेम्पो (क्र. एमएच ०४ एफजी ७१९०) कर्नाटककडे गोवंशीय जनावराचे मांस घेऊन जात आहे, अशी माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस उपअधिक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरक्षक कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, सहायक फौजदार गायकवाड, पोना सुद्रीक, पोना जंबे, शिंदे, द्वारके, अडसुळ यांनी चांदणी चौकात टेम्पो शिताफीने पकडला.

त्यातील १२०० किलो वजनाचे १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे गोमांस आणि टेम्पो किंमत ४ लाख रुपये असा ५ लाख ४४ हजारांचा मद्देमाल जप्त केला. टेम्पोचालक महमद अली खान (रा. पुना नाका, नाईकवाडपुरा, संगमनेर), मुनाफ पाशामिया कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) यांना अटक केली. याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम १९९७ चे कलम ५ (क) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.