श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव दरोड्यातील आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका वृध्द महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच ६३००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या नंतर श्रीगोंदा पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आव्हान होते. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून तपास करीत. आज पेडगाव येथीलच राहणाऱ्या शेंदऱ्या भाग्या चव्हाण याला पोलिसांनी सापळा लावून अटक केली. यावेळी आरोपी व पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली, परंतु पो नि पोवार यांनी यावेळी प्रसांगवधान दाखवत त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत सहकाऱ्यांच्या मदतीने पेडगाव शिवारातून पकडले.

या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या त्याच्या इतर चार साथीदारांचा पोलिसशोध घेत आहेत. दरम्यान ताब्यात घेतलेल्या शेंदऱ्या चव्हाण यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, सदर आरोपी अतिशय खतरनाक असल्याचे पो नि पोवार यांनी सांगितले.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी करमाळा येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे या घटनेचा उलगाडा होण्याची शक्यता निर्माण झाली होत. परंतु ताब्यात घेतलेल्या दोघंचा सदर घटनेचा संबंध नसल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आणि पुन्हा खऱ्या आरोपींचा शोध सुरु केला.

घटना घडल्याचा दिवसापासून सदर आरोपीच्या घरातील सर्वजण फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. आज मंगळवारी हा आरोपी घराकडे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पहाटे चार वाजल्यापासूनच त्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडले, परंतु यावेळी पोलीस व आरोपीमध्ये चांगलीच झटापट झाली..

सदर गुन्ह्याबाबत या आरोपीने कबुली दिली असून, घटनेच्या आदल्या दिवशी आरोपीच्या आईने या परिसराची पाहणी केली होती. या घटनेत मयत महिलेचे नातेवाईकास घरी येण्यास उशीर होत असून, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचेही या चोरांनी माहिती घेतली होती. 

त्यामुळे त्यालाच लुटण्याचा या आरोपींचा कट होता. परंतु घटनेच्या दिवशी चोरांना रात्री मयत सुशिलाबाई यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांच्या घरात प्रवेश केला असता त्यांनी आरोपी गावातीलच असल्याने त्यांना ओळखले. त्यामुळे शेंदऱ्याने तीक्ष्ण हत्याराने त्यांचा खून केला.दरम्यान पोलिसांनी आरोपीना चार दिवसात पकडल्यामुळे पो नि बाजीराव पोवार व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. तसेच उर्वरित चार आरोपींनाही लवकरच जेरबंद करणार असल्याचे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.