प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रक्षाबंधन निमित्त प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने टाटा टी गोल्डच्या सहकार्याने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी विविध बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तर डॉ.सुधा कांकरीया यांनी तणावमुक्त जीवन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश चोपडा, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, शोभा मेहेर, मधू बोरा, छाया रजपूत, डॉ.मंगल सुपेकर, निर्मला मालपाणी, चंद्रकला सुरपुरिया, सरस पितळे, अलका मुनोत, दिलीप परदेशी, कुसूमसिंग, सिमा ढोकणे, शशीकला बोरा आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

डॉ.सुधा कांकरीया म्हणाल्या की, सकारात्मक दृष्टीकोनाने आनंदी जीवन जगता येते. प्रत्येक गोष्टींच्या परिणामांचा विचार केल्यास तणाव अधिक वाढतो. चिंतेने तणाव वाढते तर चिंतणाने मार्ग निघतो. प्रत्येक कामात आत्मविश्‍वास वाढविल्यास तणाव कमी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. दिपा मालू यांनी विविध बौध्दिक स्पर्धा घेतल्या. स्पर्धेतील विजेत्या महिलांना राजेश चोपडा व डॉ.सुधा कांकरीया यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 

लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या खजीनदारपदी छाया रजपूत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. रक्षाबंधन निमित्त उपस्थित महिलांना टाटा टी गोल्डच्या वतीने चहापत्ती पावडर व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरी जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार निर्मला मालपाणी यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.