कन्हैय्याकुमार यांच्या सभेचे संरक्षण आंबेडकरी जनता करणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कन्हैय्याकुमार यांच्या नगर शहरात होणाऱ्या सभेला कोणी विरोध करून सभेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास या सभेचे संरक्षण नगरमधील आंबेडकरी जनता करील व ही सभा यशस्वी होईल, असे प्रतिपादन रिपाइं आठवले गटाचे माजी नगरसेवक अजयकुमार साळवे यांनी केले. कन्हैय्याकुमार यांच्या सभेचे नियोजन करण्यासाठी सिटी लॉन्समध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.


या वेळी संतोष खोडदे, टी. के. कांबळे, सागर भिंगारदिवे, अशोक केदारे, पोपटराव जाधव, सय्यद मतीन, इम्रान बागवान, समीर बागवान, राजू शेख, संध्या मेढे, रामदास वाघस्कर, विकास गेरंगे, अरुण थिटे, तुषार सोनवणे, संदीप पवार, सचिन तांबे, कार्तिक पासलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कन्हैय्याकुमार यांचा जातीय व धार्मिक सलोख्यासाठी संघर्ष 

कन्हैय्याकुमार आज सायं. ६ वा. लॉंगमार्च रॅलीद्वारे नगर शहरात येत आहेत. सायं. ६ वा. औरंगाबाद रोडवरील सिटी लॉन्स येथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांची जाहीर सभा होणार आहे. शहरातील काही संघटनांनी या सभेस विरोध दर्शविला आहे. परंतु त्याचा विरोध चुकीचा आहे, कारण कन्हैय्याकुमार जातीय व धार्मिक सलोख्यासाठी संघर्ष करीत आहेत. युवक, विद्यार्थी, दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक वर्गाचा प्रतिनिधी म्हणून कन्हैय्याकुमार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा कोणीही प्रतिवाद केला नाही, तर समाजातील दुर्बल घटकांचा आवाज ते बुलंद करीत आहेत. त्यांचे भाषण प्रेरणा देणारे आहे. म्हणून ही सभा अहमदनगर शहरासाठी महत्वाची आहे.

सर्व आंबेडकरी जनता गट-तट विसरून एकत्र
जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी जनता गट-तट विसरून एकत्र येऊन ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस प्रशासनाने रॅली व सभेबाबद घेतलेल्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने मान्यता दिली तर चांगलेच अन्यथा सभा स्थळाजवळील औरंगाबाद रोडवरच ही सभा घेण्याचा व ती यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने रॅली व सभेस संरक्षण देऊन सहकार्य करावे, तसेच कुणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.