कन्हैय्या कुमारच्या सभेला भाजपचा विरोध.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरमध्ये कन्हैय्याकुमारची उद्या (रविवारी) होत असलेल्या सभेला भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने विरोध दर्शविला आहे. देशद्रोही व जातीयवादास उत्तेजन देणाऱ्या या कन्हैय्याकुमारच्या सभेवर जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. 

युवा मोर्चाचे प्रदेश सोशल मिडियाचे सदस्य मल्हार गंधे व शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गौरव गुगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेला विरोध दर्शवित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा, युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, सरचिटणीस सागर कराळे, मिलिंद भालसिंग, सुजित खरमाळे, राहुल रासकर, नितीन जोशी, अज्जू शेख, कैलास गर्जे, वैभव गुगळे, अविनाश साकला, अक्षय कुमार, कैन्हय्या व्यास, संभाजी शेलार, सुरेश पुंड, शशिकांत पालवे, उमेश साठे, अभिषेक शिंदे, बंटी ढापसे, वाहिद कुरेशी उपस्थित होते.

नगर शहर हे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. शहरात सर्व जातीधर्माचे लोक शांततेच्या मार्गाने जीवन जगत आहेत. अशा नगर शहरात जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या वादग्रस्त कन्हैय्याकुमारची सभा झाल्यास जातीय वातावरण बिघण्याची चिन्हे आहेत.

कन्हैय्याकुमारच्या वादग्रस्त विधानांमुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्­न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अशा देशद्रोही व्यक्तीमत्व असलेल्या कन्हैय्याकुमारच्या नगरमधील सभेला परवानगी न देता जिल्हाबंदी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. सभा झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.