हिंदू राष्ट्र सेना मित्र मंडळाच्यावतीने वृक्षारोपण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाढते प्रदुषण हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. प्रदुषणामुळे होणार्‍या ‘व्हायरल’ आजारातही वाढ होतांना दिसते. मनुष्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध हवेची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यात युवकांनी सहभागी झाले पाहिजे. नुसतेच झाडे लावून उपयोग नाही तर त्याच्या संगोपनाची जबाबदारीही प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. 


केडगांव, शास्त्रीनगर येथे हिंदू राष्ट्र सेना मित्र मंडळाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, दिपक खैरे, सागर जाधव, अंगद महानुर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, हिंद राष्ट्र सेनेचे शहरप्रमुख सागर ठोंबरे, स्वप्नील इथापे,दिनेश अंधारे,कमलेश पवार,प्रशांत साठे, दत्ता कोतकर, विठ्ठल कोतकर, गणेश भोसले, विलास साठे, सचिन अंधारे,पप्पू मंत्री,सागर अंधारे,अमोल ठुबे,अमोल येवले, सद्दाम दुसुंगे, राहुल ढसाळ, शरद ठुबे आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी सागर जाधव म्हणाले, शास्त्रीनगर परिसारात ठिकठिकाणी झाडे लावून ट्रीगार्ड लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही सर्व युवकांनी पुढाकार घेतला असून, नागरिकही आपला सहभाग देत आहेत. हरितमय परिसराची संकल्पा या ठिकाणी राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.