कल्याणरोड परिसरातील रस्ता अतिक्रमणांमुळे गायब.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील कल्याणरोड परिसरातील डीपी रस्त्यावर पक्की घरे बांधून अतिक्रमणे करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अतिक्रमणांमुळे कल्याण रोडकडून आनंद पार्क, अनुसयानगरकडे जाणारा सुमारे ३०० मीटर लांबीचा डीपी रस्ताच गायब झाला आहे. महापालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे, की झोपेचे सोंग घेतले आहे. याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.

शहराचा जवळचा भाग म्हणून कल्याण रोडचा परिसर काही दिवसांपासून झपाट्याने विकसित होऊ लागला आहे. नवनवीन वसाहती उभ्या राहत आहेत. या परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून रस्ते, पाणी, पथदिवे, चांगल्या आरोग्य सुविधा, सांडपाण्याचा निचरा अशा मुलभूत सुविधा अद्यापपर्यंत व्यवस्थित पुरविता आलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रश्नांवर अनेकवेळा आंदोलनेही झाली आहे.

या भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेवून आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या भागात असणाऱ्या डीपी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर केले. हे काम सुरु करताना या रस्त्यावर एका ठिकाणी वळणावर एकाने पक्के घर बांधून अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे.

काही जागरुक नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण विभागाचे व नगर रचना विभागाचे अधिकारी पाहणी देखील केली आहे. पण डीपी रस्त्यावर सुमारे ३०० मीटर लांबीच्या अंतरात पक्की घरे बांधून अतिक्रमणे झाल्याने या अधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर आले आहे. महापालिकेचे अधिकारी कारवाई न करता मागे फिरले.

नागरीकांनी पुन्हा आयुक्तांना निवेदन दिले, असून डीपी रोडवर झालेल्या अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर कार्यवाही व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.