श्री विशाल गणेश मंदिर प्रवेशद्वारनिर्मितीसाठी १ किलो चांदी अर्पण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु असून, आता ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. मंदिराच्या गणेशमूर्ती समोरील प्रवेशद्वार अतिशय कलाकुसरीने बनविण्यात येत असून, त्यावर अत्यंत कोरीव व सुबक पद्धतीने चांदीचे कोरीव काम करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चांदीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता मंदिराचे सहसचिव रामकृष्ण राऊत यांनी मंदिराच्या कामाकरीता 1 किलो चांदी अर्पण केली आहे. 


या कामासाठी आणखी चांदीची आवश्यकता असून, भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन श्री विशाल गणेश मंदिरचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी केले. संकष्ट चतुर्थीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सहसचिव रामकृष्ण राऊत यांनी 1 किलो चांदी अर्पण केली. 

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, सौ.कमलबाई राऊत, सुभाष राऊत, नंदकिशोर राऊत, सुनिल राऊत, नितीन राऊत, शिवाजी शिंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना श्री.खरपुडे म्हणाले, श्री विशाल गणेश मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. आता फक्त गर्भगृहाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच भाविकांसाठी भव्य व कलाकुसरीने नटलेले मंदिर खुले होणार आहे. 

आजपर्यंत भाविकांनी केलेल्या मदतीने हे भव्य मंदिर उभे राहत असल्याचे सांगून मदत दिलेल्या व सहकार्य केलेल्या सर्व भाविकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी राऊत परिवाराच्यावतीने महापूजा व आरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने राऊत यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी रामकृष्ण राऊत म्हणाले, आपली या श्रीगणेशावर मोठी श्रद्धा आहे. मंदिराच्या सुरु असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामात आपलाही छोटासा वाटा असावा, या भावनेतून आपण आज ‘श्री’चरणी चांदी अर्पण केली आहे. मंदिराचे जिर्णोद्धराचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यात एक सुबक व आकर्षक असे श्रद्धापूर्ण मंदिर तयार होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार पांडूरंग नन्नवरे यांनी मानले. यावेळी प्रा.माणिक विधाते, अभिजित खोसे, निलेश खरपुडे, गणेश राऊत आदिंसह भाविक उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.