म.फुलेंच्या विचारांची समाजाला गरज - अण्णा हजारे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समाजकार्य करत राहिल्याने आपल्याच कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. पुढे कार्य करण्यासाठी तीच ऊर्जा उपयोगी पडते. कुठलेही कार्य असो ते लोकाभिमुख असावे. ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी या ग्रंथाबरोबरच त्यांनी केलेल्या कार्याचा, विचारांचा तसेच शैक्षणिक क्रांतीचा उपयोग सध्याच्या पिढीबरोबरच पुढील कित्येक पिढ्यांनाही होईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केले.

श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य व खेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेवून त्यांना महात्मा फुलेंनी लिहिलेले शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी हे ग्रंथ भेट दिले. यावेळी अण्णा हजारे यांनी वरील विचार व्यक्त केले.यावेळी संघाचे राज्य सचिव सुनील गुलदगड, विभागीय अध्यक्ष कैलास शिंदे, वनश्री पुरस्कार प्राप्त जनाबापु मेहेत्रे, गिरीश सूर्यवंशी आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता.

यावेळी सचिन गुलदगड यांनी आण्णा हजारे यांना संघाने केलेल्या गेली १३ ते १४ वर्षातील महाराष्ट्रभर चालू असलेल्या कार्याची माहिती दिली. श्री संत श्रेष्ठ सांवता महाराज यांची जन्मभूमि 'अरण' या धार्मिक क्षेत्रास तिर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा मिळावा, फुले दाम्पत्यास 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा, भारतातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेस सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, जिजाऊ सृष्टी प्रमाणेच सावित्रीबाई फुले सृष्टी प्रकल्प उभारावा, ११ मे हा दिवस प्रशासकीय स्तरावर 'महात्मा दिन' म्हणून साजरा व्हावा, संत सांवता महाराजांची तसेच फुले दाम्पत्याची प्रतिमा असलेले भारतीय चलन प्रकाशित करण्यात यावे आदींसह समाजातील विविध प्रश्नांवर करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी चर्चा केली व या सर्व मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली असल्याची माहिती आण्णा हजारे यांना दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.