शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला का ? पिचड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धरणे आमच्याच तालुक्यात, पुनर्वसनही आमच्याच तालुक्यात. अकोले तालुक्यातील पाण्यावर तालुक्यातील जनतेचाच पहिला हक्क असून हा हक्क डावलला तर पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ देणार नाही. आज आम्ही जितक्या आंनदाने जलपूजन करतोय त्यापेक्षा अधिक आक्रमकपणे आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.

निळवंडे धरणाच्या जलपूजनप्रसंगी पिचड बोलत होते. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे साडी, चोळी, खण, नारळ अर्पण करून पूजन करण्यात आले. धरणग्रस्त विठ्ठल आभाळे, रामहरी आवारी, देविदास कोकणे, हरिभाऊ पथवे आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी धरणग्रस्तांच्या वतीने मधुकरराव पिचड यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातले सरकारही गमतीशीर 
यावेळी पिचड पुढे म्हणाले, राज्यात व जिल्ह्यात निळवंड्याचे श्रेय घेण्यावरून भांडणे चालू आहेत. बाळासाहेब थोरात सोडले तर कुणीही मदत केली नाही. अन् पाण्यावर हक्क सांगायला सगळेच पुढे आलेत. राज्यातले सरकारही गमतीशीर आहे. लोकप्रतिनिधींचे हक्क काढून घेऊन धरणातील पाणी सोडण्यासाठी नियामक समिती सरकारने नेमली. धरण भरल्यावर आनंद होतो, पण त्यात बुडाला त्याच्या डोळ्यात मात्र पाणी असते. कालवा सल्लागार समितीचा हक्क कायम ठेवला पाहिजे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला का ?
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या नावाखाली सरकारने विकास कामे थांबवली पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला का? राज्यातले हे सरकार शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करीत आहे. २०१९ च्या निवडणुकीत 'चले जाव'चा नारा देऊन हे सरकार हुसकावे लागेल, असेही पिचड म्हणाले. 

आमदार वैभवराव पिचड म्हणाले, धरणाचे काम पूर्ण झाले, पण कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी शासनाने निधी द्यावा. यावेळी मीननाथ पांडे, विठ्ठल आभाळे, गिरजाजी जाधव, मधू पिचड यांचीही भाषणे झाली. 

सूत्रसंचलन यशवंत आभाळे यांनी केले.यावेळी आ. वैभवराव पिचड, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, ऐटीसचे अध्यक्ष जे.डी. आंबरे, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, असाका संचालक सुरेश गडाख, अशोक देशमुख, राजेंद्र डावरे, गुलाब शेवाळ, सुनील दातीर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंत आभाळे, युवक नेते विकास शेटे, दूध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर, रमेश जगताप उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.