धुमाळवाडीत एकाचा स्वाईनफ्लूने मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जल संपदाचे सेवा निवृत्त कर्मचारी सुभाष बाबूराव धुमाळ (वय 62, रा.धुमाळवाडी) यांचा स्वाईनफ्लूने मृत्यू झाला. स्वाईनफ्लूने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे.

यापूर्वी देवठाण येथे दोन जणांचा स्वाईनफ्लूने बळी घेतला होता. त्यात धुमाळ यांची भर पडल्याने, ही संख्या 3 झालेली आहे. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.