तरूणांची सामाजिक जाणिव कौतुकास्पदः प्रा.नवनाथ वाव्हळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्याच्या काळातील तरूणाई सोशल मीडियाच्या विश्वात दंग आहे.सोशल मीडिया यूजर्स तरूणांची सामाजिक जाणिव ही फक्त मेसेज शेअरींग पुरतीच मर्यादीत आहे.अशा अभासी विश्वात गुंतून न राहता प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के व त्यांच्या सर्व तरूण मित्र-परिवाराने वाढदिवसानिमित्त राबवलेला अभिनव उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा.नवनाथ वाव्हळ यांनी केले.

निंबळक (ता.नगर) येथील नाथकृपा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्धार फाऊंडेशन तर्फे चांदबीबी महाल येथे 'निसर्ग पर्यटन सहल व चर्चासत्र' तसेच 'अहमदनगर एमआयडीसी येथील आठरे पाटील बालगृह येथील मुलांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट' असा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमात पत्रकार अशोक निंबाळकर, डाॅ.बी.एम.शिंदे,ह.भ.प.सिद्धिनाथ मेटे महाराज, फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी,दिगंबर डहाळे,धनंजय गायकवाड,रामेश्वर बोराटे,विनोद सूर्यवंशी,संतोष वाघ, संतोष शिंदे,अॅड.योगेश गेरंगे,सागर शिंदे आदींनी सहभाग नोंदवला.

यावेळी पुढे बोलताना प्रा.नवनाथ वाव्हळ म्हणाले,प्रा.म्हस्के सर ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करत असतानाच सामाजिक बांधीलकी जपत सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग नोंदवत आहेत.आपण दैनंदिन आयुष्यात जी कमाई करतो,त्यातील काही हिस्सा आपण सामाजिक कार्यासाठी खर्च करायला हवा.परंतु आजच्या काळात हीच दातृत्वाची भावना कमी होत आहे.अशी सामाजिक जाणिव ठेऊन कार्य करणार्‍या व्यक्तीच समाज घडवत असतात.

प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के यांनी निंबळक (ता.नगर) येथे नाथकृपा प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्याअंतर्गत त्यांनी नाथकृपा क्लासेस, म्हस्के पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ची स्थापना केली. या शैक्षणीक संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी दरवर्षी चमकदार यश संपादन करत आहेत.तसेच नाथकृपा प्रतिष्ठाण,आत्मनिर्धार फाऊंडेशन, मानवता सेवा संघ, अहमदनगर जिल्हा दारूबंदी संघटना आदी संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत.वाढदिवसानित्त दरवर्षी ते कोणताही झगमगाट न करता बालगृहातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करतात.

यावर्षी आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगरचे ऐतिहासीक वैभव असणार्‍या सलाबतखान मकबरा तथा चांदबीबी महाल या ठिकाणी पर्यटन सहल काढण्यात आली.याच ठिकाणी 'सोशल मीडिया व वास्तव', 'निसर्ग पर्यटन व पर्यटक नागरिकांचे कर्तव्य', ऐतिहासीक ठिकाणांची सद्यपरिस्थिती व स्वच्छता'; अशा विविध विषयांवर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.चर्चासत्रानंतर अहमदनगर येथील इतिहास अभ्यासक प्रा.नवनाथ वाव्हळ यांनी चांदबीबी महाल,भूईकोट किल्ला,गर्भगिरी डोंगर यांविषयी विस्तृत माहिती सांगितली.त्यानंतर सायंकाळी एमआयडीसी येथील आठरे पाटील बालगृह येथे प्रा.मच्छिंद्रनाथ म्हस्के यांचा वाढदिवस मुलांसोबत साजरा करण्यात आला.

मान्यवरांचे स्वागत व आभार बालगृह व्यवस्थापक दिपक काळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आतनिर्धार फाऊंडेशनचे समन्वयक संतोष शिंदे,अध्यक्ष महादेव गवळी,ह.भ.सिद्धीनाथ मेटे,दिगंबर डहाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

नगर शहर व परिसरात अनेक प्रसिद्ध व दुर्लक्षीत ऐतिहासीक स्थळे आहेत.या सर्वांची माहिती प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन देऊन या मुलांना सांगण्याची इच्छा असल्याचे प्रा.नवनाथ वाव्हळ यांनी सांगितले.त्यास बालगृहाचे व्यवस्थापक दिपक काळे यांनीही आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत ही सहल घडवून आणू,असे सांगत सहमती दर्शवली.'नगर परिक्रमा' या उपक्रमातून मुलांनाही आपला हा अहमदनगरचा ऐतिहासीक ठेवा समजावून घेण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.