साकुर आश्रमशाळेतील ना. विखेच्या भेटीने प्रशासन खडबडून जागे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आदिवासी शासकीय विभागाच्या आश्रमशाळेतील अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचा आहार , मुख्याध्यापिका गायकवाड गैरहजर आदि विदारक चिञ जि प अध्यक्षा ना शालिनीताई विखे पाटील यांनी समोर आणल्याने खडबडून जागे झालेले प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे साकुर आश्रमशाळेत येउन माहीतीचा आढावा घेऊन यांनी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला. 


याबरोबर निकृष्ट आहार बनविणाऱ्याना ही नोटीसा काढल्या. तसेच आश्रमशाळेत स्वच्छतेलाही सुरुवात करण्यात आली. ना शालिनीताई विखे पाटील यांनी साकुरच्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेची अवस्था जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिली. 

त्यानंतर जिल्हाधिकारी महाजन यांनी राजुरचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांना परीस्थितीचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार ठुबे यांनी आश्रमशाळेत जाउन मुख्याध्यापिका गायकवाड, कर्मचारी यांची चांगलीच झाडाझडती केली . यावेळी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड या शनिवारपासून मंगळवार पर्यत गैरहजर असल्याचे झाले. पण याला प्रकल्पधिकाऱ्यानी दुजोरा देत मुख्याध्यापिका गायकवाड यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करणार असल्याची माहिती दिली . 

तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहार तयार करणाऱ्यांनाही खडेबोल सुनावत त्यांनाही कारणे दाखवा नोटीस काढण्याचा इशारा दिला .आश्रमशाळेततील कर्मचाऱ्यांनी कामात कारवाई केल्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.