भाजपात प्रवेश करणार नाही - राधाकृष्ण विखे पाटील.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच गेल्या सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आताचे लोक मला जवळचे वाटतात अशी कबुलीही त्यांनी दिली. 

ADVT - Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar. 
Call 9665762303 For Promote Your Brands / Product in Ahmednagar.

त्यानंतर नगर आणि राज्यातील राजकीय वर्तुळात विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागली मात्र आज भाजपात प्रवेश या बातमीत कोणतही तथ्य नसल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

शिर्डीच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी, मुख्यमंत्री आणि भाजपची स्तुती करताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केली. याआधीच्या सरकारपेक्षा मला या सरकारमधील मंत्री अधिक जवळचे वाटत असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांसमोरच केलं होतं. त्यावरून विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चेला जोर आला होता. पण स्वतः विखेपाटलांनीच भाजप प्रवेशासंबंधीचं वृत्त खोडून काढल्याने या राजकीय चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री आणि माझी मैत्री ही राजकारण विरहीत असून पक्षाने दिलेली जबाबदारी मी सक्षमपणे सांभाळत आहे,परवा शिर्डीत नगरपालिकेचा कार्यक्रम माझ्या मतदार संघात असल्याने मुख्यमंत्री आणि मी एकाच व्यासपीठावर आलो होतो. याचा अर्थ असा होत नाही की मी भाजपच्या वाटेवर आहे. आम्ही मैत्री केली म्हणून कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही, विरोधी पक्षनेता म्हणून आजवर केलेल्या कामावरती मी समाधानी असून सरकारला धारेवर धरण्यासाठी मी सक्षमपणे काम करत आहे - ना.राधाकृष्ण विखे पाटील. 

वाचा याबाबत अधिक बातम्या -

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखेंचे भाजपात जाण्याचे संकेत.

भाजप प्रवेशासाठी उशीर नको ! माजीमंत्री मधुकर पिचड यांचा विखेंना टोला.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.