पंढरपूरमध्ये बाळासाहेब विखे पाटीलांच्या स्मृती जतन करणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी संत सेवा करताना वारकऱ्यांना पंढरपुरात चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैष्णव सदन उभारण्यात आले असून भक्त निवासाची उभारणी करून पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जतन करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पंढरपूर जवळ चंद्रभागेच्या काठावर पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील या वारकरी भक्त निवासाचे भूमिपूजन आ.भारत भालके यांच्या हस्ते झाले.या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ना.विखे बोलत होते.आ. बाळासाहेब मुरकुटे,सोलापूर जिल्हा काँग्रेचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवरसमारंभाला उपस्थित होते. लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाने भटुबरे येथे सहा एकर जागेत वारकरी सदन प्रकल्प हाती घेतला आहे.

ना.विखे म्हणाले की,पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून जागा घेण्यासाठी प्रयत्नशील होते. योग्य जागा मिळाल्यानंतर तेथे महत्वाकांक्षी प्रकुल्प सुरु करण्यात आला आहे. साहेबांच्या कार्यकाळातच वैष्णव सदनच्या माध्यमातून भव्य सभागृह उभे राहिले. सहा महिन्यांपूर्वी साहेब कालवश झाले. त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करताना पंढरपूर मध्ये भव्य भक्त निवासाचे आज भूमिपूजन केले जात आहे. एकावर्षात त्याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन वारकऱ्यांना मोठी सुविधा निर्माण होईल.साहेबांच्या दुरदृष्टीतून हा प्रकल्प उभा राहत आहे.आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला हे काम सुरु होत असून त्यातून वारकऱ्यांची सेवा करताना साहेबांच्या स्मृती जतन करणे हा एकमेव उद्देश आहे असे विखे पाटील म्हणाले.

आ. भालके म्हणाले की, पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सहवासात काम करताना त्यांची वारकऱ्यांविषयीची तळमळ मी जवळून बघितली.वारकरी समाधानाने परत जावेत यासाठी सुविधांची गरज असते. विखे पाटील यांच्या दुरदृष्ठीतून पंढरपुरात हा मोठा प्रकल्प आकाराला येत आहे ही समाधानाची बाब आहे. यासाठी जर काही अडचणी आल्या तर सर्व प्रकारची मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.