२० जुलै रोजी नगर येथे जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे आंदोलन : वसंत लोढा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार पतसंस्थेतील सुमारे पाच हजार पदाधिकारी, कर्मचारी आणि ठेवीदार यांचे विविध मागण्यांसाठी २० जुलै २०१७ रोजी नगर तेथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सकाळी ११ वाजलेपासून धरणे आंदोलन केले जाणार आहे , अशी माहिती अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी सहकारी संघाचे उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.

आंदोलनाच्या नियोजनासाठी श्रीगोंदा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनने आयोजित केलेल्या सभेत श्री. लोढा बोलत होते. ते म्हणाले, थकबाकीदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया ही सहज-सुलभ परंतु कठोर व्हावी, पतसंस्थेच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, नियामक मंडळ रद्द करावे, वीस टक्के कर्ज वाटप शेतीसाठी करण्याची पोट नियमात तरतूद करावी, थकबाकीच्या वसुलीवरील सरचार्ज रद्द करावा, ५० टक्के भरणा केल्याशिवाय थकबाकीदाराचे अपील दाखल करून घेऊ नये, १०१ चे दावे ३० दिवसात निकाली काढावेत आदी २१ मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

श्रीगोंदा तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक प्रा. तुकाराम दरेकर , उपाध्यक्ष सुरेश भंडारी, अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते , व्यवस्थापक गणेश डोईफोडे यांनी पतसंस्थांच्या अडचणीवर आपले विचार मांडले.यावेळी जिल्हा स्थैर्य निधीचे संचालक शिवाजीराव कपाळे, मल्टी स्टेट पतसंस्था फेडरेशनचे संचालक आदिनाथ हजारे, मिठू शिंदे , दत्तात्रय गायकवाड आणि पतसंस्थांचे व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.