नगर शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध - सुवेंद्र गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहराच्या विकासासाठी भाजप पक्ष कटिबद्ध आहे. खा. दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून राज्य शासन व केंद्र शासनाकडे विविध विकासकामांसाठीचे प्रस्ताव पाठविले आहेत. मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या प्रस्तावांना मंजुरी मिळून शहरामध्ये विकासकामे सुरू होणार आहेत. शहराच्या भुयारी गटार योजना लवकर मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दीपाली बारस्कर या काम करणाऱ्या नगरसेविका असल्याने त्यांना विकासासाठी खा. गांधी यांनी निधी दिला, असे प्रतिपादन भाजपा गटनेते सुवेंद्र गांधी यांनी केले.

प्रभाग 3 मध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या स्थानिक विकासनिधीतून व नगरसेविका दीपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून अयोध्यानगरी, श्रीराम चौक येथे सभामंडप, पेव्हींग ब्लॉक व खेळणी बसविणे कामाचा शुभारंभ गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक महेश तवले, बाळासाहेब बारस्कर, राजाराम चव्हाण, दिनेश कुलकर्णी, शिवाजी लगड, उत्तम चेमटे, कैलास शेळके, शंतनु पांडव, दिनकर थोरात, लांडगे, अरुण बोराटे, दादासाहेब भोईटे, भोजने, सुमित्रा लगड, शैला चव्हाण, सुवर्णा पांडव, ज्योती लगड, शोभा तांदळे, मंदा सपकाळ, वैशाली पांडव, रंजन शेळके आदी उपस्थित होते.

मनपाच्या माध्यमातून जनतेचे मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी मागणी केली आहे, असे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत प्रभागातील मुलभूत प्रश्‍न मार्गी लावले आहेत. प्रभागामध्ये गंगा उद्यानासारखे उद्यान विकसित करण्याचा मानस आहे. यासाठी खा. गांधी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत. पक्षविरहीत काम केल्याने प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विकासकामांतून जनतेच्या विश्‍वासाला पात्र राहिले. यापुढील काळात प्रभागाचा विकासकामांतून कायापालट करू, असे दीपाली बारस्कर म्हणाल्या .

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.