जिल्हा बॅंकेच्या ४६५ जागांसाठी १६ हजार ७५७ अर्ज.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होवून एक महिना झाला असून या महिन्याभरात ४६५ जागांसाठी तब्बल १६ हजार ७५७ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.लवकरच परीक्षेची तारीख जाहिर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आशिया खंडात सर्वात मोठी सहकारी बॅंक म्हणून नावलौकिक असलेल्या राज्यात बॅंकेचा मोठा दबदबा आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार देखील पारदर्शी असल्याने बॅंकेत ठेवीचे प्रमाण वाढते आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात बॅंकेचा मोठा आधार असल्याने खातेदारसह ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या परंतू कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने ग्राहकांची नाराजी वाढली होती. त्यामुळे बॅंकेने तातडीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला.

ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होती. बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्यात आले आहे.
सरळसेवा भरती करण्याचा निर्णय घेवून 10 जून पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. 4 जुलैपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार होते.

पदनिहाय आलेल्या अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे -

प्रथम श्रेणी अधिकारी ७ जागा- २५
द्वितीय श्रेणी अधिकारी ६३ जागा- १२०
ज्युनिअर ऑफिसर २३६ जागा - ९ हजार ७०८
लिपिक १५९ जागा - ६ हजार ९२२.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.