१० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिरसगाव जलस्वराज २ चे भूमिपूजन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगावची अंदाजित १३ कोटी ६७ लाख रु खर्चाच्या जलस्वराज २ पाणी पुरवठा योजना साठी निवड झालेली असून त्या कामाचे इ भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दि १० जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. 


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

त्यानिमित्त कार्यक्रम स्वागत मंगल कार्यालय नेवासा रोड शिरसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. शिरसगाव ग्रामस्थांना आता शुध्द पाणी पुरवठा २४ तास मीटर पद्धतीने या योजनेने मिळणार आहे. कार्यक्रमास भानुदास मुरकुटे, आ.भाऊसाहेब कांबळे, शिर्डी संस्थान उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती दीपक पटारे, जिल्हा सरचिटणीस भाजप प्रकाश चित्ते, उपसभापती तोरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, उप मुख्य कार्यकारी परीक्षित यादव, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, अधीक्षक अभियंता गणेश गोखले, कार्यकारी अभियंता बी एस आहिरे,तहसीलदार सुभाष दळवी,समाज व्यवस्थापन तज्ञ सुन्नाबी सय्यद,गट विकास अधिकारी मोहन जाधव,आदी मान्यवर भूमिपूजन समारंभास उपस्थित राहणार आहेत.

या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तंटामुक्ती समिती अध्यक्ष गणेश मुद्गुले,अशोक स.कारखाना संचालक आबासाहेब गवारे,माजी संचालक सौ मंगल ताके,सरपंच सौ सुनंदा जाधव,उपसरपंच दीपक जाधव,ग्रामविस्तार अधिकारी व्ही डी केदारी,गव्ह.कंत्राटदार,एम टी फड सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, ग्रामस्थ शिरसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.