श्रीरामपुरात दोेन महिलांचे मंगळसूत्र लांबविले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातून काल रात्री आठच्या सुमारास मेनरोड व शिवाजरोडवरून दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्याने लांबविले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यातून मंगळसूत्र ओरबडण्याचे प्रकार थांबण्याऐवजी वाढत चालले असल्याचे या दोेन्ही घटनांवरून सिद्ध होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की : बेलापूर येथील सरपंच भरत अशोक साळुंके हे पत्नी व आईसह श्रीरामपूरला आले होते. आगाशे हॉस्पिटलसमोर थांबले असताना आई व पत्नी रस्ता ओलांडत असताना गांधी पुतळ्याकडून दुचाकीवरून आलेल्या एकाने यू टर्न मारत दत्त भुवनच्या दिशेने जाताना साळुंके यांच्या पत्नी सोनाली यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे ८० हजार रूपये किमतीचे मणीमंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला.

याचदरम्यान शिवाजी रोडला लतिका यशवंत भामरे (रा. सिद्धार्थ हॉटेल जवळ, संगमनेर रोड, श्रीरामपूर) यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या दोन्ही घटनांप्रकरणी भरत साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.