पेन्शनधारकांचा नाशिक विभागीय कार्यालावरील मोर्चा यशस्वी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर,महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ,नासिक जिल्हा इपीएफ पेंशनर्स फेडरेशन इ संघटनाच्या वतीने भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयावर पेन्शनर्स प्रश्नी पाच जिल्ह्यामधील पेन्शनधारकांचा धडक मोर्चा गुरुवारी नेण्यात आला होता.मागण्याबाबत वरिष्ठाकडे माहिती पाठविण्यात येइल.स्थानिक पातळीवरील काही प्रश्न आहेत ते लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन पदाधिका-यांना विभागीय आयुक्त अरुणकुमार अशरफ यांनी दिले.


मोर्चा यशस्वी झाल्याचे समाधान पदाधिका-यांनी व्यक्त केले.पावसाची रिमझिम चालू असताना आय टी आय चौकातून सर्व संघटनांचा धडक मोर्चा निघाला व विभागीय कार्यालयावर आला.चार हजारवर वयोवृद्ध मोर्चात पायी व छत्र्या घेऊन सहभागी झाले होते.

म.रा.पेन्शनर्स संघटना मोर्चाचे नेतृत्व सुभाष कुलकर्णी सुभाष पोखरकर,आनंदराव वायकर,ज्ञानदेव आहेर,बाबुराव दळवी,नारायण होन,बाबासाहेब गाडे,आदींनी केले होते.रु ६५०० पेन्शनवाढ व्हावी,खा.भगतसिंह कोशियारी शिफारशीप्रमाणे रु ३०००/- व महागाई भत्ता मिळावा.सर्व पेन्शनधारकांना २ वर्षे वेटेजचा लाभ मिळावा.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार १६ नोव्हे.१९९५ ते सेवानिवृत्तीच्या वेळेपर्यंतची वाढीव ८.३३ ची रक्कम सह्व्याज भरावी लागणार आहे.

तसेच सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन वाढ होणार आहे.त्याचीही थकबाकी आपणाकडे निघणार आहे.दोन्हा रकमांचे समायोजन करावे.समायोजनानंतर कामगारांकडे काही रक्कम येणे बाकी निघत असेल तर ती रक्कम मिळणाऱ्या पेन्शनमधून समान हप्ते करून वसूल केले जावेत,सर्व कामगारांना भेदभाव न करता हायर salary हायर पेन्शनचा लाभ द्यावा,आरोग्य सुविधा मिळावी,अन्न सुरक्षा लागू करावी.

काही बँकांनी रु ५००० खात्यात कमीतकमी ठेव ठेवण्याची सक्ती केली आहे.शिल्लक नसेल तर दंड आकारणी होते.पेन्शन अत्यंत अल्प असल्याने बँकेने ५०० ते १०००/-ठेव घ्यावी.याबाबत सूचना द्याव्यात.कार्याध्यक्ष एस एल दहिफळे यांनीही विभागीय आयुक्तांसामोर सविस्तर चर्चा केली.

राहिलेल्यांचा वेटेज फरक लवकरच मिळण्याची शक्यता आहे.संघटनेचे श्री ज्ञानदेव आहेर,एस एल दहिफळे,आनंदराव वायकर,शरद नेहे,भास्कर बोरसे,विष्णुपंत टकले,रमेश गवळी,सुभाष छल्लारे,बाळासाहेब चव्हाण.आर टी सोनवणे,प्रकाश कुटे,सय्यद,भागीनाथ काळे,अशोकराव पवार,सुकदेव आहेर सुभाष तांबे,बाबुराव गेठे,केशव थेटे,येखंडे,तीकांडे,आदी यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.