विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणारा श्रीगोंद्यातील नराधम शिक्षक गजाआड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणारा नराधम शिक्षक मच्छिंद्र शंकर साळवे (मूळ गाव-रांजणगाव म्हसोबा) (हल्ली रा.कल्याण रोड,अ नगर). याला श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आतच जेरबंद केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील जि प च्या प्राथमिक शाळेतील शिक्षक साळवे. हा दुपारच्या, मधल्या सुट्टीत त्याच्या विद्यार्थिनींना शाळेच्या खोलीमध्ये बोलावायचा आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. त्यानंतर मुलींना कुणालाही याबाबत सांगू नये,यासाठी धमकवायचा. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून या विद्यार्थिनींसोबत हा गैरप्रकार घडत होता.

मात्र भीतीपोटी या मुलींनी कुठेही याबाबत वाच्यता केली नव्हती. परंतु काल दि.१२ रोजी काही विद्यार्थिनींनी या प्रकाराबाबत घरच्यांना सांगितले. त्यामुळे या पीडित मुलींसह त्यांच्या पालकांनी थेट श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. 

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात काल दुपारी आरोपी शिक्षक मच्छिंद्र साळवे याच्याविरोधात विनयभंग व बालैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तोपर्यंत हा आरोपी शिक्षक फरार झाला होता.

पोलिस निरीक्षक पोवार यांनी त्याच्या शोधासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रकाश वाघ, उत्तम राऊत, किरण बोराडे, संभाजी वाबळे, प्रताप देवकाते यांचे पथक तातडीने रवाना केले. या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून काही तासाच्या आत दि.१२ रोजी रात्री ९ ते ९:३०वा च्या सुमारास सदर आरोपीला सापळा लावून पकडले. दि.१३ रोजी साळवे याला अ.नगर येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.