श्रीगोंदा तालुक्याचा पुढील आमदार जनता ठरविल - नागवडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्याचा पुढील आमदार कोण होणार हे जनता ठरविण पण आता काही जण स्वतःच आमदार ठरविण्यास निघाले आहेत पण जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणून हे आमदार ठरविणारे कोण असा सवाल भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप नागवडे यांनी श्रीगोंदा येथे भाजप युवा मोर्चाच्या आढावा बैठकीत बोलताना केला आहे. 


गेल्या दोनदिवसापासून तालुक्यात आगामी विधानसभेबाबत भाकीत वर्तविले जात आहे हे भाकीत वर्तविताना प्रत्येक जण आपण कसे सक्षम आहोत हे सांगत आहे पण शेवटी जनताच आमदार ठरवीत असते कोणी नेता आमदार ठरवीत नसतो आणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात जनता नक्कीच बदल घडवून दाखवणार आहे गेल्या ३५ वर्षात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी अश्या प्रकारे भाष्य केले नाही पण आता प्रत्येक जण आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखे बोलत आहेत.

एक दोन जणांनी वक्त्यव्य केले म्हणजे तसे होत नाही विद्यमान लोकप्रतिनिधी मुळे तालुक्याचा किती विकास झाला आहे कि तालुका भकास झाला आहे हे जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे फक्त स्वहित पाहणारा आमदार तालुक्याला नको आहे कारण माजी मंत्री पाचपुते यांनी आपल्या राजकीय जीवनात कधी दारूच्या दुकानाचे अथवा पेट्रोल पंपाचे परवाने घेतले नाहीत त्यांनी नेहमी जनतेच्या हिताचा विचार केला आहे अजूनही पदावर नसताना देखील पाचपुते हे पाण्यासाठी नेहमी आग्रही असतात कुकडीच्या बैठकीत बसून कोण तालुक्यासाठी भांडतो हे जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे.

त्यामुळे आगामी विधानसभेबाबत वायफळ बडबड करणाऱ्यांनी जनतेच्या लोकशाही मार्गाने आमदार होणार आहे याची जाणीव ठेवावी असे नागवडे म्हणाले त्याचबरोबर तालुक्याचा आमदार कोणीही होईल पण पाचपुते याना आमदार होऊ देणार नाही या भ्रमात कोणी राहू नये जनताच योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे असेही नागवडे म्हणाले.

याबैठकीला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव व नगर जिल्हा प्रभारी अनुप मोरे ,प्रदेश चिटणीस विनोद दळवी ,जिल्हा अध्यक्ष सचिन तांबे ,जिल्हा संघटन सचिव मनोज कोकाटे ,आकाश त्रिपाठी हे मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुक्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले यावेळी तालुक्यात भाजप च्या युवा मोर्चाच्या पंचायत समिती गणात प्रत्येकी दोन शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे ,तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक ,सुनीता शिंदे ,व नगरसेवक व भाजप चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.