कुकडीतून तातडीने आवर्तन सोडण्यात यावे - माजी मंत्री पाचपुते.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पाण्याअभावी उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे कुकडीच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यातून तातडीने पाणी सोडून उभ्या पिकांना आवर्तनाच्या माध्यमातून जीवदान द्यावे अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ,पालकमंत्री यांना प्रत्येक्ष भेटून केली असल्याची माहिती माजी मंत्री पाचपुते यांनी दिली.

श्रीगोंदा तालुक्यात पावसाळा सुरु झाल्यापासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात आहे सुरुवातीच्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली पिके उगवून आली असताना आता पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत तशीच परिस्थिती फळबागांची आहे मागील आवर्तनाला चार महिन्याचा काळ लोटला असल्यामुळे आता पिकांना व फळबागांना पाण्याची अत्यन्त गरज निर्माण झाली असल्यामुळे कुकडीच्या येडगाव धरणातून तातडीने पिकांना व फळबागांना आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ,पालकमंत्री प्रा राम शिंदे ,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे याना प्रत्येक्ष भेटून आपण आवर्तनाची मागणी केली आहे

पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे उभी पिके ,फळबागा पाण्या अभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे कुकडी च्या धरणातून तातडीने आवर्तन सोडणे गरजेचे आहे आपल्या मागणीला मंत्री स्थरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे माजी मंत्री पाचपुते यांनी सांगीतले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.