अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा हिंदुत्ववादी संघटना कडून निषेध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अमरनाथ यात्रेवर करण्यात आलेल्या हल्याचा निषेध श्रीगोंदा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला . शहरातून रॅली काढून बजरंग दल , विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले तर शनी चौकात पाक पुरस्कृत दहशतवादाचा पुतळा जाळण्यात आला .

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेध श्रीगोंदा शहरात करण्यात आला यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली . यात दहशतवादाचा कायमस्वरूपी बंदोबस्त कारवाया तसेच पाकिस्थानचा निषेध करून पुतळा जाळण्यात आला . हिंदू समाज सहिष्णू असून हिंदू समाजावर अन्याय होणार नाही यासाठी सरकारने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखन्ड मंत्री गुरुप्रसाद कुलकर्णी , संघाचे तालुका कार्यवाह डॉ . विक्रम कसरे , हभप  तात्या एरंडे , दीपक हिरणवाळे , निखिल भागवत , स्वप्नील खेत्रे , बाळासाहेब दुपारे , संतोष खेतमाळीस , हरिभाऊ काळे , निलेश काळे , आकाश मोहिते , विजय डहाळे . भैय्या भडारी , महेश राऊत , सोनू कोथिंबिरे , अक्षय हिरणवाळे , काका बुधवंत , शैलेंद्र सांगळे , आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.