भाजप सरकारला नावे ठेवणारांनी सरकारच्या निधीचे श्रेय घेऊ नये - लगड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जलयुक्त शिवार हि भाजप सरकारची योजना असून या योजनेतून अनेक गावे टँकर मुक्त झाली आहेत स्वतः मुख्यमंत्री या योजनेबाबत आग्रही असल्यामुळे दुष्काळी भागासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत आहेत फक्त लोकप्रतिनिधी या नात्याने उदघाटन केले म्हणजे स्वतः निधी आणला असे होत नाही,भाजप सरकारला नवे ठेवणाऱ्या आमदारांनी सरकारच्या निधीचे श्रेय घेऊ नये असे पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांनी कोळगाव येथील जलयुक्त कामाच्या उदघाट्नच्या बातम्या संदर्भात लोक प्रतिनिधींच्या विधानाला उत्तर देताना म्हणाले . 


लगड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि , दोन दिवसापूर्वी कोळगाव येथे जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे उदघाटन आमदार राहुल जगताप यांनी केले व सांगीतले या कामासाठी मी निधी दिला आहे पण जलयुक्त शिवार हि योजना भाजप सरकारची असून या योजनेबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत त्यांच्याच संकल्पनेतून राज्यातील मोठ्या संख्येने दुष्काळी गावे दुष्काळ मुक्त झाली आहे.

आपल्या तालुक्यात हि मोठ्या प्रमाणांत जलयुक्त शिवार चे कामे झाली आहेत हा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे १३ गावात या योजनेतून कामे चालू असून कृषी विभाग वन विभाग ,ल पा ,स्थानिक स्थर सामाजिक वनीकरण ,जलसंधारण ,पंचायत समिती कृषी आदी विभागाचे कामे चालू असून यासाठी अंदाजे साडे सोळा कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

याचे श्रेय आमदारांनी घेऊ नये या निधीची उपलब्धतेत पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे हा निधी फक्त भाजप सरकारने दिलेला आहे याचे श्रेय हि राज्य सरकारचेच आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी निधी आणल्याबाबत जनतेची दिशाभूल करू नये असे लगड म्हणाले
निधी भाजप सरकारचा गवगवा मात्र स्वतःचा
त्या दिवशी माझ्या गावात काम सुरु होणार म्हणून मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्याठिकाणी फक्त नारळ फॊडण्याचा कार्यक्रम झाला होता कोणतीही भाषणबाजी झाली नाही पण आमदारांनी प्रसिद्धी माध्यमात प्रेस नोट देताना स्वतः निधी आणला असा गवगवा करत आहेत हे चुकीचे आहे - पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.