श्रीगोंद्यात मटका चालवणाऱ्यांना तिघांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात अवैधरित्या अनेकजन मटका, जुगार आदी अवैध धंदे चालवत असल्याचे समजताच श्रीगोंदा पोलिसांनी धडक कारवाई करत. सोमनाथ रावसाहेब गजर, पप्पू रामदास आढागळे (रा.ससाणे नगर), राजू मनोहर खराडे (कासारगल्ली), या तिघांना अटक करण्यात आली असून. त्यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मुंबई जुगार ॲक्ट १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील सोमनाथ रावसाहेब गजर हा श्रीगोंदा कारखान्यावरील दुकानाच्या चाळीत पत्र्याच्या खोलीत मुंबई मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवताना आढळून आला. त्याच्याकडून ८३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर शहरातील बसस्थानक परिसरात कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या पप्पू रामदास आढागळे याच्याकडून ६५०रूपये व राजू मनोहर खराडे याच्याकडून ४५० रूपये रोख रकमेसह जुगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.