श्रीगोंद्यात पिस्तुलाचा धाक दाखवून एकास लुटले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर सोलापूर महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणफाट्या नजीक एका दुचाकीस्वारास तिघा लुटारूंनी आडवी गाडी लावून, पिस्तुलाचा धाक दाखवत. पल्सर दुचाकी तसेच एक मोबाईल घेऊन चोरटे लंपास झाले.ही घटना शुक्रवार दि.७ रोजी सायंकाळी घडली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. श्रीगोंदा पोलीस आरोपीचा कसून तपास करत आहेत.

या महामार्गावर अनेकवेळा लूटमार तसेच रात्रीच्या वेळी चंदन तस्करी, वाळू तस्करी, बनावट दारू वाहतूक अशा अनेक प्रकारची अवैध कामे केली जातात. याबाबत अनेक वेळा जुजबी कारवाई केली जाते. मात्र आजपर्यंत ठोस कारवाई झाली नाही. हे मात्र त्रिवार सत्य आहे..

शुक्रवार दि.७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नगर वरून विजय शरद शिंदे वय ३५ रा.मिरजगाव हे आपल्या पल्सर दुचाकीवरून क्र.एमएच १६,बीटी २३१९ मिरजगावकडे जात होते. ते या महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण फाट्याजवळ आले. तेव्हा पाठीमागून मोटारसायकलवर तिघेजन आले. त्यांनी शिंदे यांना हात दाखवून अडवले तसेच त्यांच्या दुचाकीला गाड्या आडव्या लावल्या. त्यामुळे शिंदे थांबले, त्यांनी गाडी थांबवताच त्यातील एकाने त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावला आणि त्यांना गाडीवरून खाली उतरण्यास भाग पाडले. ते खाली उतरल्यावर या लुटारूंनी त्यांच्या जवळील ओपो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला..

तसेच एकाने त्यांची दुचाकी घेऊन नगरच्या दिशेने पलायन केले. त्यापाठोपाठ बाकीचे दोघेही नगरच्या दिशेने निघून गेले, असल्याचे शिंदे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरील घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.