१ एप्रिल २००९ पूर्वीच्या थकबाकीदार शेतक-यांनी आत्महत्या करायच्या काय ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मुख्यमंत्र्यांनी दि. १ एप्रिल २००९ पासून कर्ज घेणा-या थकीत शेतक-यांना कर्फ माफीच्या निकषात घेतलेले आहे. केंद्राने ७२ हजार कोटीची कर्ज माफी ही३१ मार्च २००७ पर्यंतच केलेली होती. मग १ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कर्ज काढून थकबाकीत गेलेल्या शेतक-यांनी आत्महत्या करायच्या काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आपल्या पत्रात प्रा. दरेकर म्हणतात, डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना आणि शरदचंद्र पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना ३१ मार्च २००७ पर्यंतची ७२ हजार कोटीची कर्ज माफी २४ मे २००८ रोजी जाहीर करून सर्व शेतकरी कर्ज मुक्त केले होते.त्या तारखेनंतर म्हणजे १ एप्रिल २००७ पासून कर्ज काढून थकलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत ( कर्ज माफीत ) घ्यावे .

कुटुंबाकडे पाहून कर्ज दिले जात नाही तर खातेदार पाहून कर्ज दिले जाते व ते त्या त्या खातेदाराला फेडावे लागते. येथे कुटुंब निकषाचा काहीही संबध नाही म्हणून तो निकष काढून टाकावा. आयकर विवरण पत्र ज्यांच्या नावाने असेल ते उत्पन्न शेती व्यतिरिक्त आहे.त्या उत्पन्नाचा आणि शेती कर्जाचा काहीही संबध नाही. नोकरदारांनी शेतीमध्ये स्वत:चा पगार घालून तोट्याची ( आतबट्ट्याची ) शेती करावी आणि कर्ज फेडावे अशी शासनाची अपेक्षा असेल तर नोकरदार आपल्या शेती पडीक ठेवतील व त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होईल म्हणून हा निकष देखील चुकीचा आहे. तो रद्द करावा. स्वामीनाथन आयोग लागू केला तर कोणीही कर्ज माफी मागणार नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी ३५ जिल्ह्यातील ३६ लाख १० हजार २२६ शेतक-यांना कर्ज माफी दिल्याची आकडेवारी जाहीर केली आहे, ती खरी नाही. त्यातच मुंबईचे ८१३ शेतकरी दाखविले आहेत.शासनाच्या विविध अटीत आणि निकषात लाखो शेतकरी अडकून पडले असून सुमारे १५ टक्के म्हणजे पाच लाख शेतक-यांनाच कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. म्हणून कर्ज माफी हाणून पाडणारे जाचक निकष काढून टाकावेत अशीही मागणी प्रा. दरेकर यांनी केली असून, आपल्या निवेदनाच्या प्रती खा. शरदचंद्र पवार, आ. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, आ. दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंढे, आ. बच्चू कडू, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, अनिल घनवट यांना पाठविल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.