जलयुक्त शिवार योजनेतुन कोळगावसाठी १.८४ लाख निधी- आ.राहुल जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ आज कोळगाव शिंदेमळा या ठिकाणी आमदार राहुल जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आला. या कामासाठी ३२ लाख ८४ हजार रुपयांची निधी मंजुर करण्यात आलेला आहे. 


या कामाच्यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले की, कोळगाव मध्ये १ कोटी ३८ लाखांचे कंपार्टमेंटची कामे पुर्ण केलेली असून, त्याची लवकरच उद्घाटने करणार आहे. या जलयुक्तच्या कामामुळे दुष्काळी भागाला खुप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी कुकडी सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव थोरात, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड, मा. जि.प. सदस्य हेमंतसर नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक विनायक लगड व विवेक पवार, मार्केट कमिटी संचालक संभाजीराव काटे, कोळगावचे सरपंच विजुपाटील नलगे, उपसरपंच मधुकाका लगड, चेअरमन सतिष लगड, व्हा. चेअरमन गोरख घोंडगे, दादासाहेब निर्फळ, दामुकाका साके, योगेश तोंडे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.