श्रीगोंद्यातून दहावीत शिकणाऱ्या तीन मुलांचे अपहरण ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दहावीत शिकत असलेल्या तीन अल्पयवीन मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेण्याची घटना श्रीगोंदे येथे घडली आहे. श्रीगोंदे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिं विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. ही तिन्ही मुले काष्टी येथील आहेत. तुषार विश्वनाथ गावडे (वय १६) व त्याचे दोन मित्र ऋषीकेश अशोक गावडे (वय १६) व ज्ञानेश्वर संतोष नागे (वय १६) अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकारामुळे श्रीगोंदे तालुक्यातील पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

तुषार, ऋषीकेश व ज्ञानेश्वर हे तिघे काल मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास काष्टी येथील जनता विद्यालयात चाललो असे सांगून घराबाहेर पडले होते. ऋषीकेश याचे वडील अशोक यांना ही तिन्ही मुले शाळेत गेलीच नाहीत, अशी माहिती मिळाली. तुषार याच्या वडील विश्वनाथ यांना देखील मुले शाळेत नसल्याची माहिती समजली. या मुलाच्या शोध घरच्यांनी सुरू केला. हे तिघे एका रिक्षाने दौंडकडे गेल्याची माहिती समोर आली. या मुलांच्या पालकांनी दौंड रेल्वे स्थानक, बसस्थानक येथे सर्वत्र त्यांचा शोध घेतला. पण ती सापडली नाहीत.

दरम्यान ऋषीकेश याचा मामा याने ज्ञानेश्वर नागे याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. तो भ्रमणध्वनी पुण्यात लागला. एका अनोळखी महिलेने तो उचलला होता. तिने हा भ्रमणध्वनी रेल्वेत सापडल्याचे समोरून सांगितले. तो तुम्ही घेऊन जाऊ शकता, असे सांगितले. परंतु काहीवेळाने पुन्हा संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद आला. यावर मुलांच्या घरच्यांनी श्रीगोंदे पोलिसांकडे धाव घेतली. विश्वनाथ दत्तात्रय गावडे (वय ४२) यांच्या तक्रारीवरून अपहरणाच्या गुह्याची नोंद करण्यात आली आहे. .

दरम्यान या मुलांकडे पैसे असल्याचे त्यांच्या काही मित्रांनी पोलिसांना सांगितले. अल्पवयीन मुलांना पुणे, मुंबई या शहरांचे मोठे आकर्षण वाटते. त्यामुळे ते स्वता: फिरायला गेलेत, तर नाहीत ना, याची चर्चा आहे. पोलीस त्यानुसारच तपास करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.