जिल्हा बॅंकेसमोर सेनेचे 'ढोल बजाओ' आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती नोटिस बोर्डावर लावून ती जाहीर करावीत यासाठी शिवसेनेने जिल्हा बॅंकेसमोर ढोल बडवले. आठ दिवसात ही मागणी पूर्ण करा अन्यथा जिल्हा बॅंकेसह तिच्या सर्व शाखा बंद करण्याचा इशारा शिवसेनेने सोमवारी दिला.



ADVT - Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


नगर जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावण्याच्या मागणीसाठी जिल्हा बॅंकेसमोर शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, घनश्याम शेलार, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, भगवान फुलसौंदर, निलेश लंके, महापौर सुरेखा कदम, नगरसेवक योगिराज गाडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी प्रा. गाडे म्हणाले की, शिवसेनेच्या आंदोलनामुळेच राज्य सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा निर्णय घेणे भाग पडले. नगर जिल्ह्यातील कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बॅंकेच्या विविध शाखेतील नोटीस बोर्डवर लावावी. शेतकऱ्यांचे नाव, गाव व शासनाच्यावतीने किती कर्जमुक्ती मिळाली, याची सविस्तर यादी लावावी तरच मुख्यमंर्त्यांचा पारदर्शक कारभार कर्जमाफीतून दिसेल, असे ते म्हणाले.

शेलार म्हणाले की, सरकार कर्जमाफी करत आहे तर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची भूमिका घ्यावी. आठ दिवसात यादी नोटीस बोर्डवर न लावल्यास जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा घनश्याम शेलार यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी बॅंकेला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना शासनाची कर्जमुक्ती मिळालेली असेल, अशा शेतकऱ्यांची यादी आपल्या बॅंकेच्या विविध शाखेतील नोटीस बोर्डांवर शेतकऱ्यांचे नाव, गाव व शासनाच्यावतीने किती कर्जमुक्ती मिळाली, याची यादी ताबडतोब लावण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने बॅंकेच्या विविध शाखांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याची नावांची यादी अद्याप आमच्याकडे आली नसल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


ADVT - Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia

ADVT - Website Designing,Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign
ADVT - Bulk SMS Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Powered by Blogger.