​​​अज्ञानाच्या नाशानेच जगात शांतता नांदेल - मुख्यमंत्री.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्ञानामुळे जगात अशांतता आणि संघर्ष आहे. आत्मज्ञान प्राप्तीद्वारे अज्ञानाचा नाश करून जगात शांतता आणि बंधुभाव नांदेल. यासाठी गुरुमाऊलींचे मार्गदर्शन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोकमठाण येथे आत्मा मालिक ध्यानपिठाच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार दिलीप गांधी, आमदार स्‍नेहलता कोल्‍हे, बाळासाहेब मुरकुटे, नगराध्‍यक्षा योगिता शेळके आदी उपस्थित होते.

एकीकडे गुरुमाऊलीचे आत्मस्वरुपात आशीर्वाद तर दुसरीकडे साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आत्मा मालिक ध्यानपीठाच्या माध्यमातून गुरुमाऊलीने जीवनात चांगला मार्ग दाखविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. गुरुमाऊलीनी जीवनभर आत्म्याचे महत्व समजून सांगितले आहे. गीतेतही आत्म्याचे महत्व विशद केले आहे. आत्मा ही एक ऊर्जा आहे, शक्ती आहेृ ही ऊर्जा कधीही नष्ट होऊ शकत नाही. ज्याला आत्मज्ञान मिळते तो जीवन हेच कर्म म्हणून व्यतीत करु शकतो. योगी व्यक्तीलाच आत्मरुपी ऊर्जेची अनुभूती करता येते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर भौतिक सुखाची लालसा नसते, असे त्यांनी संगितलेृ

शाश्वत तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गुरुमाऊली करतात असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीची रचना विज्ञानाधिष्ठित आहे. संस्कतीने विज्ञानाची निष्ठा कधीच सोडली नाही. जगभरातील सर्व ज्ञान आपल्या ध्यान योगाच्या माध्यमातून पोहचविण्याचे उत्तम कार्य आत्मा मालिक या ध्यानपीठाच्या माध्यमातून केले जात असून, यामुळे प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आत्मा मालिक ध्यान पीठाच्यावतीने ध्यानयोग अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वात्मक ध्यानयोग मिशनचे कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.