शिर्डीतील लॉजमधून पाच जणांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी शहरातील सुतारगल्लीतील साई वीरभद्र लॉजवर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी दोन तरुणींवरही कारवाई करण्यात आली. संबंधितांना सोमवारी राहाता न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

साई वीरभद्र लॉजमध्ये काही तरुणींकडून देहविक्री होत असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनात लॉजवर छापा टाकण्यात आला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

सुनील उर्फ संतोष गोटीराम पवार (वय 38, गजानननगर, कोपरगाव), भानुदास साहेबराव दवंगे (वय 26, रा. मळेगाव थडी, ता. कोपरगाव), रमजान आरदुल्ला शेख (वय 23, रा. बैलबाजार रोड, कोपरगाव), रवींद्र उमाकांत आहेर (वय 41, श्रीकृष्णनगर, शिर्डी), राहुल बाबासाहेब बनकर (रा. विवेकानंदनगर, शिर्डी) यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी राहुल बनकर हा लॉजमालक पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी शिर्डी शहर पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.