शेवगाव तालुक्यातील आखेगाव रस्त्यावर दोघांची हत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यात दोन जणांची हत्या झाली असून आज सकाळी त्यांचे मृतदेह तालुक्यातील आखेगाव रस्त्यावर आढळून आले, मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश असून, या दोन मृतदेहांच्या शेजारीच आणखी एक जखमी व्यक्ती आढळली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

मयतांमध्ये दीपक रामनाथ गोरडे (वय ३५) आणि मंगल अनिल कालकूटे (वय ३२) यांचा समावेश आहे ,तर बाळू केसरकर असे जखमीचे नाव आहे.

घटनास्थळी दोन मोबाईल आढळून आले आहेत, हि घटना घातपात आहे कि हत्या ह्याचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------



Powered by Blogger.