शेवगावमध्ये कुंटणखान्यांवर पोलिसांचे छापे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव शहरातील शिवाजीनगर भागात चालणाऱ्या विविध कुंटणखान्यां वर आज दुपारी 1.45 वाजता पोलिसांनी छापे टाकले. उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून दोन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, या छाप्यात सापडलेल्या 15 महिलांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

शेवगावमध्ये चालणाऱ्या वेश्‍याव्यवसायाबाबत फ्रिडम फर्ड या सेवाभावी संस्थेचे सत्यजित देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलीस अधीक्षक सोनाली कदम व तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक नितीन मगर असे चार पथक तयार करण्यात आले होते. पथकातील पोलीस कर्मचारी व सेवाभावी संस्थेच्या सदस्यांना बनावट ग्राहक करून त्यांच्याकडे शंभर रुपये दराच्या नोटा देऊन त्या नोटांचे नंबर लिहून घेऊन त्यांना कुंटणखाना चालू असलेल्या ठिकाणी पाठविले. त्या ठिकाणी शरीर उपभोगासाठी महिलेची मागणी करून ती पूर्ण होत असल्याचे दिसून येताच पथकातील लोकांना बाहेर येऊन इशारा केला.

यावेळी दोन महिलांसह प्रदीप मुसवत हे कुंटणखाना चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी कुंटणखाना चालवत असलेला सचिन रूपचंद मुसवत (रा. शेवगाव), माधव रामदास गोरे (रा. रामनगर, शेवगाव), अंकुश नामदेव गरड (रा. राजपिंप्री, ता. गेवराई), संदीप संजय शिंदे (रा. मंगळापूर, ता. नेवासा), फिरोज करीम सय्यद (रा. निंबे जळगाव, ता.गंगापूर), सुभाष जगन्नाथ खेडकर (रा. नागलवाडी, ता. शेवगाव), रामेश्वर आसाराम परांडे (रा. एकतुणी, ता. पैठण) या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कुंटणखाना चालविणारे चौघेजण फरार आहेत.

या सर्वांविरुध्द स्त्री व मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम सन 1956 ते कलम 3, 4, 5, 6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुंटणखाना चालवणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून, या गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्याविरुध्द उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हद्दपारीचा गुन्हा दाखल कऱणार आहोत, अशी माहिती शिवथरे यांच्याकडे देणार आहोत. यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश व अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली होती.

त्यानंतर काही दिवस पायबंद बसला होता. कृष्णप्रकाश यांची बदली झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू झाला. या ठिकाणी मराठवाड्यातील गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यातून शेवगावमध्ये मोठे गुन्हे घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई महत्त्वाची आहे, अशी अपेक्षा शेवगावमधून व्यक्‍त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.